डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबाबात उध्दव ठाकरेंचे मोठे विधान!

uddhav-thackeray-appeal-over-indu-mill-dr-babasaheb-ambedkar-statue
उध्दव ठाकरेंचे स्मारकाबाबत मोठे विधान uddhav-thackeray-appeal-over-indu-mill-dr-babasaheb-ambedkar-statue

मुंबई : इंदू मिलवरील जागेवर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम आज रद्द करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कार्यक्रम होणार होता. उद्धव ठाकरेंनी सर्वांच्या सहभागानं पायाभरणी होणार असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान कोणीही या मुद्द्यावरून राजकारण करू नये अशी विनंती त्यांनी केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे. यामध्ये कुठलाही पक्ष- संघटना असा भेदभाव असूच शकत नाही,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. पायाभरणीच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापले होते. परंतु कार्यक्रम रद्द तुर्तास पडदा पडला आहे.

अशा महत्वपूर्ण कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणे गरजेचे

एमएमआरडीएने राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर पुतळ्याच्या सुधारित संरचनेच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण केली आणि त्यानुसार पायाभरणी कार्यक्रम करण्याचे नियोजन केले. मात्र अशा महत्वपूर्ण कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे हे मी लक्षात आणून दिले आहे आणि त्यामुळेच ठरवल्याप्रमाणे एक चांगला कार्यक्रम सर्व आवश्यक मान्यवरांना निमंत्रित करून पुढील काही दिवसांत करावा असे निर्देश दिले आहेत.

अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली आहे. त्यामुळे कोणीही या मुद्द्यावरून राजकारण करू नये अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here