सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल झाला आहे. स्ट्रीट फूड बनवणाऱ्या एक तरुणीची नुडल्स बनवण्याची डान्सिकल गंगनम स्टाईल पाहून सोशल मीडियावर नेटकरी अक्षरशः आवाक झाले आहेत. अनेकांनी या तरुणीच्या कौशल्याचे कौतुक केले आहे. पाहू या हा भन्नाट व्हिडिओ.
Me making supernoodles after coming home at 4am hammered pic.twitter.com/tph250JDiI
— Sarah 💋 (@Hinder_Surprise) October 9, 2020
जपानी तरुणी या व्हिडिओत एक रस्त्यावर नुडल्सची गाडी चालवताना दिसते. या ठिकाणी मोठ्या गॅसच्या ज्वाळांवर ती हटके पद्धतीने एका कढईत नुडल्स बनवते. साऊथ कोरियन संगीतकार साय याचं एक प्रसिद्ध गंगनम नावाचं गाण आहे, या गाण्यावर ताल धरत मोठ्या चमच्याला कढईच्या कानात अडकवत ती कढई वेगाने गोल फिरवत अत्यंत डान्स करीत नुडल्स तयार करते.
पाहा l VIDEO पूनम पांडेचा हॉट डान्स व्हायरल
तिची ही अनोखी पद्धत पाहण्यासाठी रस्त्यावर लोकांनी मोठी गर्दी केल्याचे आणि तिचे फोटो, व्हिडिओ घेत असल्याचे दिसत आहे. सुरुवातीला हा व्हिडिओ टिकटॉकवर शेअर करण्यात आला होता. त्यानंतर तो इतरही सोशल मीडियावर व्हायरल झाला. या अनोख्या कलाकृतीवर आश्चर्य व्यक्त केलं आहे.





















































































































































































