भोपाळ l मध्य प्रदेशातील चित्रकूट येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या RSS चिंतन शिबिराचा आज समारोप झाला. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत Mohan Bhagwat यांनी मोठं विधान केलं. मुस्लिम मोहल्ल्यांमध्येही Muslim communities संघाच्या शाखा निर्माण RSS Branches करण्यात येणार असल्याचं मोहन भागवत यांनी जाहीर केलं. तसेच आयटी सेल स्थापन करण्यात येणार असल्याचंही जाहीर करण्यात आलं. त्यामुळे मुस्लिम वस्त्यांमध्येही आपला जम बसविण्याची संघाने तयारी सुरू केल्याची जोरदार चर्चा आहे.
चित्रकूट येथे संघाचं 9 जुलैपासून चिंतन शिबीर सुरू होतं. हे शिबीर ऑनलाईन होतं. त्याचा आज समारोप करण्यात आला. यावेळी संघात अनेक छोटेमोठे बदल करण्यात आले आहेत. आगामी काळात अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे शिबीर अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे. यावेळी पश्चिम बंगाल आणि मुस्लिम समुदायाला संघाशी जोडून घेण्याचा निर्णयही घेण्यात आला.
बंगालवर स्वारीची तयारी…
पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपची सत्ता आली नाही. त्यामुळे आता बंगाल सर करण्यासाठी संघाने रणनीती आखली आहे. यावेळी संघाने पश्चिम बंगालला तीन खंडात विभाजित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता दक्षिण बंगालचं मुख्यालय कोलकाता, मध्य बंगालचं मुख्यालय वर्धमान जिल्ह्यात तर उत्तर बंगालचं मुख्यालय सिलीगुडी येथे असेल. शिबीराच्या जबाबदाऱ्यांमध्येही महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत.
भैय्याजी जोशी विहिंपचे संपर्क अधिकारी…
यावेळी क्षेत्र प्रचारक प्रदीप जोशी यांचे अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यांचं मुख्यालय चंदीगडमध्ये असेल. त्याशिवाय भैयाजी जोशी यांच्याकडे संघाकडून विश्व हिंदू परिषदेची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना विहिंपचे संपर्क अधिकारी करण्यात आलं आहे. डॉक्टर कृष्णा गोपाल यांना विद्या भारतीचे संपर्क अधिकारी करण्यात आले आहे. तर सरकार्यवाहक अरुण कुमार हे संघ आणि भाजप दरम्यान समन्वयक म्हणून काम पाहतील.
संघ आयटी सेल स्थापन करणार…
देशभरातील मुस्लिम वस्त्यांमध्ये संघाच्या शाखा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच संघाशी मुस्लिमांना जोडण्यात येणार आहे. त्याशिवाय संघाने सोशल मीडियावरही अधिक सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय संघाने आयटी सेल उघडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आयआयटी पासआऊट तरुणांना या आयटी सेलमध्ये संधी देण्यात येणार आहे.
पाच दिवसीय शिबीरात या विषयांवर चर्चा…
9 जुलैपासून 13 जुलैपर्यंत हे शिबीर पार पडलं. एकूण पाच दिवस हे शिबीर चाललं. यावेळी 9 आणि 10 जुलै रोजी क्षेत्र प्रचारकांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. 10 आणि 11 जुलै रोजी प्रांत प्रचारकांची बैठक पार पडली. 11 जुलै रोजी क्षेत्र प्रचारक आणि प्रांत प्रचारकांच्या बैठकीत निघालेल्या निष्कर्षांवर चर्चा करण्यात आली. तसेच संघाच्या भविष्यातील रणनीतीवरही चर्चा करण्यात आली.
हेही वाचा
महागाई,कोरोना प्रश्नावरुन जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा भाजपाचा डाव; नाना पटोलेंचा हल्लाबोल
माझा आतापर्यंतचा प्रवास खडतर होता, पुढेही खडतरच दिसतोय : पंकजा मुंडे