परभणी l औरंगाबादचे डॉ.सय्यद मुजम्मील Dr.syed Muzammil हे माहेरी आलेल्या पत्नीला नेण्यासाठी परभणीला जात असताना कारचे टायर फुटून भीषण अपघात झाला. कार रस्त्याच्या बाजुला शेताच्या बांधावर असलेल्या 30 फूट खोल विहिरीत कोसळली. यामध्ये डॉ. सय्यद मुजम्मील Dr.syed Muzammil यांचा मृत्यू झाला.
ही घटना आज शनिवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास परभणी-पाथरी रोडवरील पेडगाव शिवारात हॉटेल बगीचा जवळ घडली. होंडा कंपनीची कार एमएच 01 बी.जी. 4886 औरंगाबाद येथून परभणीकडे येत होती.
कार 30 फूट खोल विहिरीत कोसळली
डॉ. सय्यद मुजम्मील Dr.syed Muzammi हे स्वतः ही कार चालवत होते. या संदर्भात प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, गाडी भरधाव वेगाने परभणीकडे येत असताना गाडीचे टायर फुटले. यानंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला.
यामुळे ही गाडी रस्त्याच्या बाजुला शेताच्या बांधावर असलेल्या 30 फूट खोल विहिरीत गाडी कोसळली. नंतर नागरिकांनी ही कार ट्रॅक्टरच्या साहाय्याने काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला शक्य होत नव्हते. त्यामुळे क्रेनच्या साहाय्याने गाडी बाहेर काढण्यात आली.
हेही वाचा l देश धार्मिक कट्टरता आणि उग्र राष्ट्रवाद या दोन महामारीने ग्रस्त : हामिद अन्सारी
डॉ. सय्यद मुजमिल यांचा मृतदेहही बाहेर काढण्यात आला. त्यांचे मेहुणे घटनास्थळी आल्यानंतर ओळख पटली. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे.
पत्नीला घेण्यासाठी परभणीकडे येत होते
डॉ.सय्यद मुजम्मील हे औरंगाबाद येथे वास्तव्यास होते. ते माहेरी आलेल्या पत्नीला नेण्यासाठी परभणीत येत होते. मात्र, वाटेतच त्यांचा अपघात झाला. अपघातानंतर रस्त्यावर बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तर काही काळ वाहतूकही खोळंबली होती.










































































































































[…] […]