मुंबई : ज्या डॉक्टरांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थाळ्या, टाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं होतं त्यांच्यापैकी किती जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला? या प्रश्नाचं उत्तरही सरकारने माहित नाही असंच दिलं. देशात किती स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला. त्याचेही उत्तर सरकारकडे नाही. त्यावरुनच प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.
संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात दोन प्रश्न विचारले गेले. सरकारकडे त्याची उत्तरे नाहीत. अशा स्वार्थी नेत्याचा आम्ही निषेध करतो. अशा स्वार्थी नेत्याची देशाला गरज नाही असं टीकास्त्र प्रकाश आंबेडकर यांनी सोडलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी एका व्हिडिओव्दारे नरेंद्र मोदी यांच्यावर विविध विषयांवरून टीका केली. केंद्र सरकारला सर्व कामांमध्ये अपयश आले आहेत. अशीही टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.