युवक काँग्रेस रा. स्व. संघाच्या रेशिम बागेत जाऊन देशाचे संविधान भेट देणार

काँग्रेसचा उद्या २८ सप्टेंबरला नागपूरात मशाल यात्रा व जाहीर सभा.

Congress to march from Kalamanuri to Hingoli on March 9 against anti-farmer BJP government.
Congress to march from Kalamanuri to Hingoli on March 9 against anti-farmer BJP government.

मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी देशाला पवित्र असे संविधान देऊन सर्व जाती धर्मांना जगण्याचे हक्क व अधिकार दिले पण मागील काही वर्षात संविधानावरच घाला घातला जात आहे. संविधान वाचवण्यासाठी आता संघर्ष करण्याची वेळ आली असून २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या दरम्यान नागपूरच्या दीक्षाभूमी ते सेवाग्राम आश्रम असे ‘संविधान सत्याग्रह पदयात्रेचे’ आयोजन केले आहे. २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीदसरा व रा. स्व. संघाचा शतकपूर्ती दिन आहे. (Rashtriya Swayamsevak Sangh (RSS ) in India Announces Plans for Centenary Year Celebrations) यावेळी युवक काँग्रेस रा. स्व. संघाच्या रेशिम बागेत जाऊन देशाचे संविधान भेट देणार आहे.

सोमवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता वाजता दीक्षाभूमी येथून या पदयात्रेचा प्रारंभ होणार असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही पदयात्रा होत आहे. या पदयात्रेत काँग्रेसचे वरिष्ठ नेतेपदाधिकारीसर्व ब्लॉक अध्यक्षमाजी नगरसेवकफ्रंटलसेलचे अध्यक्षसेवादलमहिला काँग्रेसयुवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील.

महान क्रांतिकारीदेशभक्त भगतसिंग यांच्या जयंती निमित्ताने रविवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता नागपूरच्या व्हेरायटी चौक ते संविधान चौक पर्यंत भव्य मशाल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेची सांगता संविधान चौकातील जाहीर सभेत होईलअशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here