Bihar Assembly Election 2020 l ‘’लिहून घ्या..नितीश कुमार पुन्हा कधीच मुख्यमंत्री बनणार नाहीत’’

चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांच्यावर साधला निशाणा

you-can-get-me-to-give-you-in-writing-that-nitish-kumar-will-never-again-be-the-cm-after-nov-10-chirag-paswan-Ljp
you-can-get-me-to-give-you-in-writing-that-nitish-kumar-will-never-again-be-the-cm-after-nov-10-chirag-paswan-Ljp

पाटणा l बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी Bihar Assembly Election 2020 आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. ”तुम्ही माझ्याकडून लिहून घेऊ शकता की नितीश कुमार १० नोव्हेंबरनंतर पुन्हा कधीच मुख्यमंत्री बनणार नाहीत.

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी Bihar Assembly Election 2020 आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. दरम्यान, १७ जिल्ह्यांतील ९४ जागांसाठी मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात २८ ऑक्टोबर रोजी १६ जिल्ह्यांतील ७१ जागांसाठी ५३.५४ टक्के मतदान झाले होते. तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात ७ नोव्हेंबर रोजी १५ जिल्ह्यांतील ७८ जागांसाठी मतदान होणार आहे. मतमोजणी १० नोव्हेंबर रोजी होईल.

हेही वाचा l Bihar Assembly Election 2020 l बिहार विधानसभेसाठी १७ जिल्ह्यांतील ९४ जागांसाठी आज मतदान, ४ मंत्र्यांचे भवितव्य ठरणार

बिहार विधानसभेत २४३ जागा आहेत. बहुमतासाठी १२२ जागा जिंकणे आवश्यक आहे. यंदाच्या निवडणुकीत नितीश कुमार सरकारच्या आठ मंत्र्यांचे भवितव्य पहिल्या टप्प्यात इव्हीएममध्ये बंद झाले. चार मंत्र्यांचे भवितव्य आज सुरू असलेल्या दुसऱ्या टप्प्यात इव्हीएममध्ये बंद होत आहे.

चिराग पासवान म्हणाले, माझी यात काहीच भूमिका नसेल, मला केवळ ”बिहार प्रथम, बिहारी प्रथम” एवढंच हवं आहे. मला हवं आहे की बिहारमधील चार लाख नागरिकांच्या सूचनेनुसार तयार केल्या गेलेल्या व्हिजन डॉक्युमेंटनुसार काम केले जावे.” असं चिराग पासवान म्हणाले आहेत.

चिराग पासवान यांनी आज मतदान केले व बिहारमधील जनतेला मतदानासाठी आवाहन केले. बिहार1stबिहारी1st आणि असंभव नितीश या हॅशटॅगचा वापर करत, त्यांनी ट्विट केले आहे. बिहारच्या समस्त जनतेला आवाहन आहे की, स्वतःवर गर्व करण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावा. येणाऱ्या सरकारमध्ये बिहारमध्ये बदल झालेला दिसायला हवा. काही कामं झाली पाहिजेत.

निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर नितीश कुमार भाजपाला धोका देतील आणि राजदसोबत जातील, असं विधान चिराग यांनी  या अगोदर केलं होतं. याद्वारे त्यांनी बिहारच्या राजकारणाला एक नवा ट्विस्ट देण्याचा प्रयत्न केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here