डॉ.कफ़ील खान यांची 7 महिन्यानंतर सुटका

Dr-kafeel-khan Says- thanks-to-uttar-pradesh-government-for-not-encountering-me
Dr-kafeel-khan Says- thanks-to-uttar-pradesh-government-for-not-encountering-me


नवी दिल्ली : गोरखपुर बीआरडी मेडिकल कॉलेजचे निलंबित डॉ. कफ़ील खान यांना इलाबाद हायकोर्टाने आज मंगळवारी जामीन मंजुर केला. त्यांची ताबडतोब तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश दिले. डॉ. कफ़ील खान यांच्यावर नागरिकता संशोधन बिलाबाबत भडकाऊ भाषण दिल्याचा आरोप होता. (Dr. kafeel khan immediate realese as allhabad hc)

ड़ॉ. कफ़ील खान यांना राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) अंतर्गत अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना मथुराच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. सात महिन्यांपासून ते तुरुंगात होते. त्यांच्या जामिनासाठी प्रयत्न सुरु होते.

न्यायालयाने सांगितले डॉ. कफ़ील खान यांचा भाषण भडकाऊ, किंवा हिंसा पसरवणारा नव्हता. नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचं आवाहन होतं. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये डॉ. कफ़ील खान यांनी नागरिकता संशोधन बिलाबाबत अलीगढ मुस्लिम महाविद्यालयात भाषण दिलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर अलिगढ सिविल लाईंस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, त्यांना 29 जानेवारीला मुंबईमध्ये अटक करण्यात आली होती. 10 फेब्रुवारीला त्यांना जामिन मिळाला होता. परंतु तीन दिवसापर्यंत त्यांची जेल प्रशासनाने सुटका केली नव्हती. त्याच वेळी त्यांच्यावर अलिगढ जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत कारवाई केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here