मुंबई: माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना मुंबईतील कांदिवली परिसरात समोर आली आहे. एका मादी कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली समता नगर पोलिसांनी एका नराधमाला अटक केली आहे. संजय एम. गौड असे या आरोपीचे नाव असून, त्याच्या या विकृत कृत्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.mumbai dog sexual abuse case
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी एका उघड्या गटारात आरोपी मादी कुत्र्यावर अत्याचार करत होता. यावेळी कुत्र्याच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक घटनास्थळी धावून गेले. नागरिकांनी आरोपीला रंगेहाथ पकडले आणि तातडीने प्राणी कार्यकर्त्यांना याची माहिती दिली. PETA इंडिया आणि मार्मिक अॅनिमल वेल्फेअर फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी तातडीने धाव घेत पोलिसांत तक्रार दाखल केली. स्थानिकांनी यावेळी आरोपी गौडाचा लैंगिक छळ करतानाचा व्हिडीओ शूट केला.
कायदेशीर कारवाई आणि कलमे
प्राणी कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यानंतर समता नगर पोलिसांनी रविवारी संध्याकाळी एफआयआर (FIR) दाखल केला. आरोपी संजय गौड याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३२५ आणि प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६० च्या कलम ११(१)(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन महिन्यांत या परिसरात प्राण्यांवरील अत्याचाराची ही दुसरी घटना असल्याने प्राणीमित्रांनी चिंता व्यक्त केली आहे.






















































































































































































