मुंबई भाजपचा पदाधिकारी बांगलादेशीच; तपासात सत्य आले समोर

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली माहिती

when-fadnavis-was-the-chief-minister-anvay-naik-case-was-suppressed-home-minister-maharashtra-anil-deshmukh
when-fadnavis-was-the-chief-minister-anvay-naik-case-was-suppressed-home-minister-maharashtra-anil-deshmukh

मुंबई: बांगलादेशींच्या नावाने राजकारण करणा-या भाजपचा खरा चेहरा उघडकीस आला आहे. भाजपचा उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष BJP’s North Mumbai Minority cell President रुबेल जोनू शेख Rubel Jonu Shaikh हा बांगलादेशी Bangladeshi असून, त्याने खोट्या कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिकत्व घेतल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांनी सांगितले की, मला तक्रार प्राप्त झाली होती. त्या तक्रारीच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी चालू आहे. रुबेल जोनू शेख याला अटक करण्यात आली असून चौकशीत तो बांगलादेशी असल्याचे अनेक पुरावे पोलिसांच्या हाती आले आहेत.

रुबेल जोनू शेख हा बांगलादेशी असून त्याने खोट्या कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिकत्व मिळविले असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती.

रुबेल हा भाजपाचा पदाधिकारी असून या पक्षाने कोणतीही शहानिशा न करता त्याला पद कसे दिले. बेकायदेशीररित्या घुसखोरी करून मुंबईमध्ये राहणाऱ्या अशा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी काही समाज विघातक कार्य केल्यास त्याची जबाबदारी भाजप घेणार का? असा प्रश्नसुद्धा महेश तपासे यांनी उपस्थित केला होता.

तसेच ही बाब गंभीर स्वरुपाची असल्याने याची चौकशी करण्याबाबतचे निवेदन व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे गृहमंत्री अनिल देशमुख यांना देण्यात आले होते. या संदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

पोलिसांनी याचा तपास केला असता चौकशीदरम्यान त्याच्या घरात प. बंगाल राज्यातील मलापोटा ग्रामपंचायत, जिल्हा – २४ उत्तर परगणा येथील ग्रामपंचायत रहिवाशी दाखला तसेच बोलगंडा आदर्श हायस्कूल जिल्हा – नादिया येथील शाळा सोडल्याचा दाखला मिळाला होता. पोलिसांनी मलापोटा ग्रामपंचायतमध्ये जाऊन चौकशी केली असता रुबेल जोनू शेख याचा नावाचा कोणताही रहिवाशी दाखला देण्यात आलेला नाही अशी माहिती समोर आली.

तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, नादिया प. बंगाल येथील रेकॉर्ड तपासून पाहिले असता रुबेलकडे असलेला दाखला हा दुसऱ्याच कोणाच्या तरी नावावर असलेल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी रुबेलच्या घरात सापडलेला शाळा सोडल्याबाबतच्या दाखल्याचे जिल्हा शाळा निरीक्षक ए.स. जि. नादिया, राज्य प. बंगाल येथील रेकॉर्ड तपासून पाहिले होते. 

सदर दाखल्यामध्ये नमूद करण्यात आलेली बोलगंडा आदर्श हायस्कूल, बोलगंडा जि. नादिया ही शाळाच अस्तित्वात नसल्याचे आढळून आले. याच सर्व खोट्या कागदपत्रांच्या आधारावर त्याचे आधार कार्ड व पॅनकार्ड सुद्धा काढल्याचे तपासात समोर आले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

हेही वाचा: 

नरेंद्र मोदींच्या ‘त्या’ आरोपांवरुन पवारांचा टोला; म्हणाले, ‘’सहा वर्षांपासून…’’

“आम्ही तेल प्रकल्प उभारले, सात वर्षात तुम्ही काय केलं”; काँग्रेसचा मोदींवर पलटवार

एक्टर Indra Kumar ने की आत्महत्या, दोस्त के घर में पंखे से लटका मिला शव!

VIDEO | विवेक ओबेरॉयला विनामास्क-विनाहेल्मेट बाईक राईड, ‘मस्ती’ नडली

दिशाच्या समर्थनार्थ ग्रेटा थनबर्गचं ट्विट; लोकशाही आणि मानवाधिकाराच्या मुद्द्यावरून म्हणाली…

Mahavitaran Recruitment 2021 | 12 वी & ITI उत्तीर्णांना संधी – महावितरण मध्ये 7000 पदांची जम्बो भरती

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here