IPL Final 2020 l सचिन तेंडुलकरचा ‘मुंबई इंडियन्स’ला ‘हा’ मोलाचा सल्ला

sachin-tendulkar-advices-mumbai-indians-rohit-sharma-before-ipl-2020-final-mi-vs-dc-see-video
sachin-tendulkar-advices-mumbai-indians-rohit-sharma-before-ipl-2020-final-mi-vs-dc-see-video

मुंबई l यंदाच्या आयपीएल IPL 2020 हंगामात मुंबई आणि दिल्ली यांच्यात ३ सामने झाले. तीनही सामन्यात मुंबईने दिल्लीला मात दिली. आज होणाऱ्या अंतिम सामन्यातही मुंबईच्या संघाला मोठ्या प्रमाणावर पसंती मिळताना दिसत आहे. अशा वेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर sachin-tendulkar याने मुंबईच्या संघाला एक मोलाचा सल्ला दिला आहे.

मुंबई इंडियन्सच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. या व्हिडीओत सचिन तेंडुलकरने sachin-tendulkar मुंबईच्या संघासाठी एक सकारात्मक गोष्ट सांगितली आहे.

मुंबईचा संघ म्हणजे एक कुटुंब

मुंबईसाठी तुम्ही जेव्हा मैदानावर खेळायला उतरता तेव्हा तुम्ही केवळ एक व्यक्ती नसता, तर संपूर्ण उर्जेचा समूह असता. सर्वप्रथम आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईचा संघ म्हणजे एक कुटुंब आहे.

IPL 2020 सारख्या स्पर्धेचा वेग हा प्रचंड असतो. अशा वेगवान स्पर्धेत अनेक अडथळे आणि आव्हानं असतात. पण संघाच्या चांगल्या-वाईट गोष्टींमध्ये आपण सगळे एकमेकांच्या सोबत असतो. त्यामुळे सर्वस्व पणाला लावून खेळा”, असा सल्ला सचिनने व्हिडीओच्या माध्यमातून दिला.

सचिन काय म्हणाला पाहा हा  व्हिडीओ…

अंतिम फेरीसारख्या महत्त्वाच्या प्रसंगात सगळ्यांनी एकसंध राहण्याची गरज आहे. तुम्ही सारे हे नक्कीच करू शकाल. संघाच्या मालकांपासून ते सहाय्यक कर्मचारी वर्गापर्यंत सारेच तुम्हाला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम कामगिरी केली पाहिजे, असे प्रेरणादायी विचार सचिनने व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here