शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनाने एक व्रतस्थ सेवेकरी हरपला : नाना पटोले

कर्मयोगी शिवशंकर भाऊ पाटील यांनी श्री गजानन महाराज संस्थानच्या माध्यमातून अध्यात्मिक व सामाजिक कार्याची सांगड घालून नवा आदर्श घालून दिला.

Shri-sant-gajanan-maharaj-Shegaon-sansthan-trustee-of-shivshankar-bhau-patil-nana-patole
Shri-sant-gajanan-maharaj-Shegaon-sansthan-trustee-of-shivshankar-bhau-patil-nana-patole

मुंबई l श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगावचे विश्वस्त Shri Sant Gajanan Maharaj Shegaon sansthan Trustee शिवशंकर भाऊ पाटील Shivshankar Bhau Patil यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने एक व्रतस्थ सेवेकरी हरपला, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले Maharashtra congress state president Nana Patole यांनी व्यक्त केल्या आहेत.

कर्मयोगी शिवशंकर भाऊ पाटील यांनी श्री गजानन महाराज संस्थानच्या माध्यमातून अध्यात्मिक व सामाजिक कार्याची सांगड घालून नवा आदर्श घालून दिला. मंदिर व्यवस्थापनाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे शेगावचे गजानन महाराज मंदिर. गजानन महाराज मंदिराच्या सेवाकार्यात त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते. भाऊसाहेबांनी संस्थानच्या माध्यमातून विविध प्रकल्प उभे केले.

ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण मिळावे म्हणून शैक्षणिक संस्था उभारल्या. भाऊंची अत्यंत साधी राहणी व उच्च विचारसरणी होती. गजानन महाराजांच्या विचाराचा वारसा त्यांनी आयुष्यभर जोपासला. त्यांनी केलेले कार्य चिरंतर राहिल. शंकरभाऊंच्या निधनाने गजानन महाराजांच्या भक्तांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.

शिवशंकरभाऊ पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पाटील कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. 

ऋषितुल्य व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड 

“शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनामुळे आयुष्यभर निस्वार्थपणे संत गजानन महाराजांची सेवा करणारे ऋषितुल्य व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. संस्थानच्या सेवाभावी कार्याच्या विस्तारामध्ये त्यांची भूमिका नेहमी स्मरणात राहील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.” अशा शब्दांमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दुःख व्यक्त केलं आहे. 

हेही वाचा

Shivshankar Bhau Patil l शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांचं निधन

Delhi Cantt Rape Murder Case l “राहुल गांधी न्याय मिळेपर्यंत तुमच्यासोबत असेन”

संजय राऊतांनी राज्यपालांना दिला ‘हा’ इशारा,म्हणाले…

Maharashtra TET -2019 l टीईटी पात्र उमेदवार एका वर्षापासून गुणपत्रिकेच्या प्रतिक्षेत,शिक्षण विभागाचे दुर्लक्ष!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here