T20 WC: राशीद खानच्या नावावर ४०० गडी बाद करण्याचा विक्रम

t20-afghanistan-cricketer-rashid-khan-took-400-wickets-news-update
t20-afghanistan-cricketer-rashid-khan-took-400-wickets-news-update

नवी दिल्ली: टी २० क्रिकेट प्रकारात राशीद खानची Rashid Khan गणती सर्वोत्कृष्ट गोलंदाजात केली जाते. २० षटकांच्या सामन्यात राशीद खानने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. टी २० मध्ये ४०० गडी बाद करण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे. अशी कामगिरी करणार चौथा आणि तिसरा गोलंदाज ठरला आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात मार्टिन गुप्टिलला बाद करताच राशीद खानचे टी २० क्रिकेटमध्ये ४०० गडी पूर्ण झाले आहेत.

राशीद खानने आपल्या २८९ सामन्यात ४०० गडी बाद करण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. या यादीत वेस्ट इंडिजचा ड्वेन ब्रावो आघाडी आहे. त्याने एकूण ५५३ गडी बाद केले आहेत. त्यानंतर वेस्ट इंडिजच्या सुनील नरिनचा नाव येतं. त्याने ४२५ गडी बाद केले आहेत. इमरान ताहिरही या यादीत आहे. ताहिरने एकूण टी २० क्रिकेटमध्ये ४२द गडी बाद केले आहेत. राशीदच्या नावावर आता ४०० गडी असून शाकिब अल हसनच्या नावावर ३९८ गडी आहेत.

टी २० वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीत अफगाणिस्तानला पराभूत करत न्यूझीलंडने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. अफगाणिस्तानने २० षटकात ८ गडी गमवून १२४ धावा केल्या होत्या. न्यूझीलंडसमोर विजयासाठी १२५ धावांचं आव्हान दिलं होतं. अफगाणिस्तानने विजयासाठी दिलेल्या १२५ धावांचा पाठलाग करताना डेरिल मिशेलच्या रुपाने न्यूझीलंडला पहिला धक्का बसला.

मुजीब उर रहमानच्या गोलंदाजीवर मोहम्मद शहजादने त्याचा झेल घेतला. त्याने १२ चेंडूत १७ धावा केल्या. त्यानंतर केन विलियमसन आणि गुप्टिल जोडीने डाव सावरला. संघाची धावसंख्या ५७ असताना मार्टिन गुप्टिल राशीद खानच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने २३ चेंडूत २८ धावा केल्या. या खेळीत ४ चौकारांचा समावेश आहे. केन विलियमसन आणि डेवॉन कॉनवे यांनी तिसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली आणि संघाचा विजय सोपा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here