लॉकडाऊन: बुलडाणा जिल्हा प्रशासनाकडून नियमावलीत बदल; पाहा सुधारित आदेश

guardian-minister-aslam-shaikh-gives-reaction-on-lockdown-restrictions-in-maharashtra-news-update
guardian-minister-aslam-shaikh-gives-reaction-on-lockdown-restrictions-in-maharashtra-news-update

बुलडाणा: बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव Corona spreads वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी कडक नियमावली जारी केली होती. पण आता त्या नियमावलीत काही बदल करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तुंची दुकानं वगळता अन्य सर्व दुकानं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती Buldhana District Collector S Ramamurthy  यांनी सोमवारी दुपारी एक आदेश काढला होता. त्या आदेशात रात्री काहीसा बदल करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली, देऊळगावराजा, खामगाव आणि मलकापूर या पाच नगर परिषद अंतर्गत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या ठिकाणी काटेकोरपणे नियमांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

काय आहे जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश?

>> हॉटेल, रेस्टॉरंट यांना सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण या दरम्यान फक्त होम डिलिवरीची सुविधा उपलब्ध असेल.

>> सर्व खासगी, वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सक सेवा नियमित वेळेनुसार सुरु राहतील.

>> कोणतेही रुग्णालय रुग्णांना सेवा नाकारणार नाही.

>> औषधी दुकाने आणि रुग्णवाहिकांची सेवा 24 तास सुरु राहणार आहे.

>> पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅस एजन्सी सुरु राहणार आहेत.

>> पूर्वनियोजित परीक्षा वेळेनुसार होतील.

>> चिकन, मांस, अंडी विक्रीची दुकानं सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळत सुरु राहतील.

>> कृषी सेवा केंद्र, कृषी प्रक्रिया उद्योगही सकाळी 9 ते दुपारी 3 यावेळेत सुरु राहणार आहेत.

आठवडी बाजार बंद

कोरोना रुग्ण वाढल्यामुळे बुलडाणा शहरातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश येथील प्रशासनाने दिले आहेत.

पाहा: Pooja Chavan- Sanjay Rathod Photo | गबरु, केक पूजा चव्हाण-संजय राठोडांच्या नव्या फोटोंची पुन्हा चर्चा

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here