Ajit Pawar: ‘त्या अपघाताची चौकशी…’ अजित पवारांच्या अकाली निधनावर भारतीय क्रिकेटपटूची मागणी..

Ajit Pawar Died: अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर भारताच्या एका धडाकेबाज क्रिकेटपटूने अजित पवार यांना श्रद्धांजली वाहत असताना त्याने कोणती मागणी केली आहे, जाणून घ्या..

ajit-pawar-plane-crash-investigation-should-be-a-proper-said-indian-cricketer-news-update-today-freepressindia.in
ajit-pawar-plane-crash-investigation-should-be-a-proper-said-indian-cricketer-news-update-today-freepressindia.in

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अनुभवी नेते अजित पवार (Ajit pawar) यांचे विमान अपघातात निधन झाले. या अपघाताच्या बऱ्याच बातम्या आतापर्यंत समोर येत आहेत. पण भारताच्या धडाकेबाज फलंदाजाने मात्र या विमान अपघाताच्या चौकशीबाबत एक महत्वाचं विधान केलं आहे.

अजित पवार आज सकाळी मुंबईहून बारामती येथे जात होते. यावेळी अजित पवार यांचे विमान बारामती येथील विमानतळावर उतरणार होते. पण विमान उतरत असताना अपघात झाला. या अपघातामध्ये अजित पवार यांचे निधन झाले. अजित पवार हे फक्त राजकारणापुरते मर्यादीत नव्हते, तर क्रीडा क्षेत्रातही त्यांचे भरीव योगदान होते. त्यामुळे अजित पवार यांच्या निधनानंतर आता क्रीडा क्षेत्रातही हळहळ व्यक्त केली जात आहे. भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याचबरोबर अजिंक्य रहाणेनेही अजित पवार यांना श्रद्धांनी जली वाहिली आहे. पण महाराष्ट्राबाहेरच्या एका खेळाडूने आता अजित पवार यांना श्रद्धांजली वाहताना एक मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here