राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना पत्रातून सुनावले खडे बोल

केंद्राच्या अपयशामुळेच आता देशात लॉकडाऊन

Lacking guts to attack directly, RSS attacks Constitution by stealth: Rahul Gandhi
Lacking guts to attack directly, RSS attacks Constitution by stealth: Rahul Gandhi

नवी दिल्ली l देशात कोरोना स्थितीला संपूर्ण केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कोरोना म्यूटेशन ट्रॅक करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर सर्व प्रकारच्या म्यूटेशनवर लवकरात लवकर व्हॅक्सिन चाचणी करावी असंही सांगितलं आहे. तसेच लसीकरण वेगाने करण्याची आग्रही मागणीही केली आहे. congress-leader-congress-mp-rahul-gandhi-letter-to-pm-modi-about-covid-situation-news-update

‘देशातील कोरोना स्थिती पाहता तुम्हाला पुन्हा पत्र लिहावं लागत आहे. देशावरील संकट पाहता भारतीय नागरिकांना प्राथमिकता देणं गरजेचं आहे. देशातील नागरिकांना या समस्येतून काढण्यासाठी जे शक्य होईल ते करा, अशी मी तुम्हाला विनंती करतो’, असं त्यांनी आपल्या पत्रात लिहीलं आहे. हे पत्र काँग्रेसनं आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर पोस्ट केलं आहे.

‘जेव्हा कोरोना पसरत होता तेव्हा कोरोनावर विजय मिळवल्याच्या आवेशात राहीले. केंद्राच्या अपयशामुळेच आता देशात लॉकडाऊनची स्थिती उद्भवली आहे.’, अशी टीका राहुल गांधा यांनी या पत्रात केली आहे. केंद्र सरकारकडे लसीकरणासाठी स्पष्ट रणनिती नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

हेही वाचा: भारतात कोरोना ब्लास्ट! तिसऱ्या दिवशी चार लाखांहून अधिक रुग्ण; ३९१५ मृत्यूंची नोंद

राहुल गांधी यांनी पत्र लिहिण्यापूर्वी सकाळी ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. “सेंट्रल व्हिस्टा हा एक गुन्हेगारी स्वरुपातील अपव्यय आहे. लोकांच्या जीवनाचा प्रश्न असताना नवं घर मिळवण्यासाठी आंधळा अहंकार नको”, असा टोला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवरून मोदी सरकारला मारला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here