भारतात कोरोना ब्लास्ट! तिसऱ्या दिवशी चार लाखांहून अधिक रुग्ण; ३९१५ मृत्यूंची नोंद

india-reports-4-lakh-14-thousand-88-new-covid19-cases-in-the-last-24-hours-news-update
india-reports-4-lakh-14-thousand-88-new-covid19-cases-in-the-last-24-hours-news-update

नवी दिल्ली: भारतात कोरोनाचा कहर सुरुच आहे. दैनंदिन रुग्णसंख्या रोज नवे उच्चांक गाठत आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी चार लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत देशात ४ लाख १४ हजार १८८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत चालली आहे. सलग ११ व्या दिवशी तीन हजारांहून अधिक बळींची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे. india-reports-4-lakh-14-thousand-88-new-covid19-cases-in-the-last-24-hours-news-update

देशात गेल्या २४ तासांत ४ लाख १४ हजार १८८ नवे रुग्ण आढळले असून यासोबत एकूण रुग्णसंख्या २ कोटी १४ लाख ९१ हजार ५९८ वर पोहोचली आहे. दरम्यान ३९१५ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत २ लाख ३४ हजार ८३ जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. देशात सध्या ३६ लाख ४५ हजार १६४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

हेही वाचा: दिल्लीत भाजपचा पराभव झाल्यानंतर दंगे उसळते, आता प. बंगालमध्ये तेच?; शिवसेनेचा भाजपवर निशाणा

India reports 4,14,188 new #COVID19 cases, 3,31,507 discharges, and 3,915 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry

Total cases: 2,14,91,598
Total recoveries: 1,76,12,351
Death toll: 2,34,083
Active cases: 36,45,164

Total vaccination: 16,49,73,058 pic.twitter.com/8sLmOnQqjz

— ANI (@ANI) May 7, 2021

दरम्यान गेल्या २४ तासांत ३ लाख ३१ हजार ५०७ जणांना डिस्चार्ज मिळाला असून आतापर्यंत १ कोटी ७६ लाख १२ हजार ३५१ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत १६ कोटी ४९ लाख ७३ हजार ५८ जणांचं लसीकरण झालं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here