पेट्रोल पंपांवरील पंतप्रधान मोदींचे होर्डिंग ७२ तासांत हटवा

निवडणूक आयोगाचा आदेश

Election commissioner of india -asks-petrol-pumps-to-remove-hoardings-with-pm-modi-photos-within-72-hours
Election commissioner of india -asks-petrol-pumps-to-remove-hoardings-with-pm-modi-photos-within-72-hours

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra modi यांचा फोटो असणारे PM modi photos होर्डिंग ७२ तासांत हटवा असा आदेश निवडणूक आयोगाने Election commissioner of india पेट्रोल पंपांना Petrol pumps दिला आहे. पेट्रोल पंपावर केंद्र सरकारच्या योजनांची जाहिरात करणाऱ्या होर्डिंगवर पंतप्रधानांचा फोटो असणं आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.

निवडणूक आयोगाने शुक्रवारी पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पद्दुचेरी या पाच राज्यांच्या निवडणूक तारखांची घोषणा केल्यानंतर आचारसंहिता लागू झाली. तृणमूल काँग्रेसने केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाकडून हा आदेश देण्यात आला आहे.

हेही वाचा: Low Blood Pressure | कमी रक्तदाबाची समस्या? आहारात सामील करा ‘हे’ घटक!

तृणमूल काँग्रेसने कोरोना लसीकरण मोहिमेच्या पोस्टर आणि व्हिडीओंमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोचा वापर करण्यावरुन आक्षेप नोंदवला होता. निवडणूक आयोगाने पेट्रोल पंपांसोबतच करोना लसीकरण मोहिमेच्या प्रचारात वापरण्यात आलेला मोदींचा फोटोही ७२ तासांत हटवण्यास सांगितलं आहे.

हेही वाचा: SBI Mega E-Auction: 5 मार्च से सस्ते में मकान, दुकान, प्लॉट, गाड़ियां खरीदने का मौका

दरम्यान सोमवारी भाजपानेही तृणमूल काँग्रेसविरोधात निवडणूक आय़ोगाकडे धाव घेत आचारसंहिता लागू झालेली असतानाही पश्चिम बंगालमधील दोन मंत्री मतदारांना आकर्षित करण्यासाठी आश्वासन देत असल्याचा आरोप केला होता. भाजपाने दोन्ही मंत्र्यांना विधानसभा निवडणूक लढण्यापासून रोखण्यात यावं अशी मागणी केली आहे. तृणमूल काँग्रेसने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

हेही वाचा: SBI Pension Loan:एक मिस्ड कॉल से मिलेगा 14 लाख का लोन, एसबीआई पेंशन लोन की जाने पुरी डिटेल्स 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here