धक्कादायक: कुंभमेळ्यात १ लाख कोरोना चाचण्या बनावट!

covid-19-haridwar-kumbh-festival-1-lakh-test-fake-report-news-update
covid-19-haridwar-kumbh-festival-1-lakh-test-fake-report-news-update

उत्तराखंड l कोरोना Covid19 संकटात कुंभमेळा पार पडल्याने टीका झाल्यानंतर अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्तराखंड आरोग्य विभागाने हरिद्धारमध्ये कुंभमेळ्यादरम्यान Haridwar kumbh festival करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी चार लाख चाचणी अहवाल Test Report बनावट असल्याचा संशय व्यक्त केला होता. यानंतर करण्यात आलेल्या तपासात एकूण १ लाख चाचणी अहवाल बनावट असून खासगी एनज्सीच्या सहाय्याने तयार करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.Covid-19-haridwar-kumbh-festival-1-lakh-test-fake-report-news-update

एका प्रकरणात तर एकाच फोन क्रमांकावरुन ५० जणांचं रजिस्ट्रेशन करण्यात आलेलं असून एकच अँटिजन टेस्ट किट ७०० चाचण्यांसाठी वापरण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. “पत्ते आणि नावं काल्पनिक आहेत.

हरिद्वारमधील ‘घर क्रमांक ५’ मधून ५३० नमुने घेण्यात आले आहेत. एकाच घऱात ५०० लोक राहत असणं शक्य तरी आहे का? काहीजणांनी तर मनाप्रमाणे पत्ते टाकले आहेत. घर क्रमांक ५६, अलिगड; घर क्रमांक ७६, मुंबई असे पत्ते लिहिले आहेत,” अशी माहिती तपासात सहभागी एका अधिकाऱ्याने दिली आहे.

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “खोटे फोन नंबरही देण्यात आले आहेत. कानपूर, मुंबई, अहमदाबाद आणि १८ इतर ठिकाणच्या लोकांनी एकच फोन क्रमांक दिला आहे”.

कुंभमेळ्यातील आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्जून सिंह सेनगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “एजन्सीने दोन खासगी प्रयोगशाळांमधील नमुने जमा करणं अपेक्षित होतं. त्याचीही चौकशी सुरु आहे”.

दरम्यान आरोग्य सचिव अमित नेगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “हरिद्वारच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना सविस्तर तपास अहवाल पाठवण्यात आला आहे. अनेक ठिकाणी अनियमितता आढळली असून जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी १५ दिवसांनी सविस्तर अहवाल पाठवल्यानंतर आम्ही कारवाई करु”.

हेही वाचा : Ram Mandir Scam l रामाच्या नावाने चंदा हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा!

हरिद्वारचे जिल्हा दंडाधिकारी सी रवीशंकर यांनी या प्रकरणाची पूर्ण चौकशी केली जात असून पुढील नोटीस येईपर्यंत सर्व एजन्सींचं देय थांबण्यात आली असल्याचं सांगितलं आहे.

धक्कादायक म्हणजे एजन्सीकडून नमुने गोळा करण्यासाठी जबाबदारी देण्यात आलेले २०० जण राजस्थानमधील विद्यार्थी आणि डेटा ऑपरेटर असल्याचं समोर आलं आहे जे कधीही हरिद्वारमध्ये आले नव्हते.

“नमुने गोळा करणारी व्यक्ती तिथे स्वत: उपस्थित असणं गरजेचं आहे. एजन्सीकडे नोंदणी असणाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यातील ५० टक्के राजस्थानचे रहिवासी असून विद्यार्थी आणि डेटा ऑपरेटर आहेत,” अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here