पाकिस्तान-चीनच्या सीमेवरही इतका बंदोबस्त बघितला नाही; राज ठाकरे मोदी सरकारवर संतापले

farmer-protest-mns-raj-thackeray-agricultur-bills-modi-government-
farmer-protest-mns-raj-thackeray-agricultur-bills-modi-government-

नवी मुंबई: दिल्लीच्या टिकरी, सिंघू आणि गाझीपूर सीमांवर मागील दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन farmers protest सुरू आहे. हे प्रकरण इतकं चिघळायची गरज नव्हती. चीनच्या वा पाकिस्तानच्या सीमेवरही मी इतका बंदोबस्त बघितला नाही. इतका बंदोबस्त शेतकऱ्यांसाठी करण्याची आवश्यकता नाही. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे MNS Chief Raj Thackeray यांनी मोदी सरकारला सुनावलं आहे.

राज ठाकरे आज बेलापूर येथील न्यायालयात हजर राहिल्यानंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी सवाद साधला. यावेळी राज यांना शेतकरी आंदोलनासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर राज ठाकरे म्हणाले, “मला असं वाटतं हे फारच चिघळलं आहे. आम्ही हे सगळं पाहतो आहोत.

तो कायदा चुकीचा नाही. पण, केंद्राने राज्यांचा विचार करून, राज्यांशी चर्चा करून याची अंमलबजावणी केली पाहिजे. शेवटी प्रत्येक राज्यामध्ये कृषी खातं आहे. प्रत्येक राज्याची कृषी धोरणं वेगळी आहे. प्रत्येक राज्याच्या कृषी मंत्री वा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घ्यायला पाहिजे होतं.

हे प्रकरण इतकं चिघळायची गरज नव्हती. चीनच्या वा पाकिस्तानच्या सीमेवरही मी इतका बंदोबस्त बघितला नाही. इतका बंदोबस्त शेतकऱ्यांसाठी करण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या मागण्या समजून घेतल्या पाहिजे,” असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारावर बोलताना राज ठाकरे यांनी मोदी सरकारला इशाराही दिला. “कसं आहे शेवटी ताणताणत आपण कुठपर्यंत नेणार आहोत? एक २६ जानेवारी काय घेऊन बसला आहात तुम्ही याच्यामध्ये…,” असं म्हणत राज ठाकरेंनी मोदी सरकारला सावधगिरीचा इशारा दिला. 

हेही वाचा : 

फडणवीसांना त्यासाठीमाझ्या मनापासून शुभेच्छा : संजय राऊत

Chakka Jam: कृषि कानूनों के विरोध में किसानों का चक्‍का जाम आज, क्या खुला, क्या बंद यहां जानें सब

Petrol-Diesel Price Today: आपल्या शहरात पेट्रोल-डिझेलचे भाव काय?; एका क्लिकवर जाणून घ्या

farmers protest : शेतकरी आंदोलनावर UN Human Rightsचं ट्विट; दिला ‘हा’ सल्ला

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here