
नवी दिल्ली : देशभरात जीएसटीची (GST) नवी कर रचना लागू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी पाच वाजता संपूर्ण देशाला संबोधित केलं. यावेळी नरेंद्र मोदी यांनी उद्यापासून म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जीएसटीची नवी कररचान लागू होणार असल्याची माहिती दिली. आता केवळ 5 आणि 18 टक्के एसटी लागू राहणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिली. या नव्या कर रचनेमुळे देशातील नागरिकांची मोठी बचत होणार आहे. अनेक जीवनाश्यक वस्तूंवर आता जीएसटी लागणार नाही. तर काहींवर केवळ 5 टक्के जीएसटी लागणार आहे. त्यामुळे अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत. उद्यापासून नेमक्या कोणकोणत्या वस्तू स्वस्त होणार आहेत, याची सविस्तर माहिती.
जीएसटीच्या नव्या कर रचनेनुसार, टुथपेस्ट, साबन आणि शॅम्प्यू स्वस्त होणार आहे. या वस्तूंवर आधी 12 टक्के जीएसटी लागायचा. आता केवळ 5 टक्के जीएसटी लागणार आहे.
नव्या जीएसटी रचनेनुसार, पॅकेज फुड्स जसे की बिस्किट, स्नॅक्स आणि जूस स्वस्त होणार आहेत. या वस्तूंवर आता केवळ 5 टक्के कर लागणार आहे. तसेच डेअरी उत्पादक तूप आणि कंडेंस्ड मिल्क स्वस्त होणार आहे. याशिवाय सायकल, स्टेशनरी वस्तूदेखील स्वस्त होणार आहेत. तसेच निश्चित किंमतीपर्यतचे कपडे आणि बूट स्वस्त होणार आहेत.
‘या’ वस्तू आणखी स्वस्त होणार
नव्या जीएसटी नियमांनंतर आता ज्या वस्तूंवर 28 टक्के जीएसटी लागायचा तो आता 18 टक्क्यांवर आला आहे. यामुळे वस्तूंच्या किंमती देखील कमी होणार आहेत. या नव्या नियमांमुळे एसी म्हणजेच एअर कंडीशनर, रेफ्रिजरेटर, डिशवॉशर, मोठ्या स्क्रिनच्या टीव्ही, सीमेंट स्वस्त होणार आहे.
‘या’ गाड्या स्वस्त होणार
उद्यापासून अनेक वाहनं स्वस्त होणार आहेत. लहान कार ज्या 1200ूू पेक्षा कमी इंजिनच्या आहेत त्यांचा जीएसटी आता 28 टक्क्यांवरुन 18 टक्के झाला आहे. त्यामुळे कारचे भाव घसरणार आहेत. तसेच टू व्हिलर देखील स्वस्त गोणार आहेत. तसेच विमा प्रिमियदेखील स्वस्त होणार आहे.
उद्यापासून काय महाग होणार?
नव्या जीएसटीच्या नियमानुसार, काही वस्तूंवर 40 टक्के कर लागणार आहे. लक्झरी कार या महाग राहणार आहेत. त्यांच्यावर 40 टक्के कर हा लागू राहणार आहे. तसेच तंबाखूजन्य पदार्थ, दारू, पान मसाला, ऑनलाईन सट्टेबाजी ते गेमिंग प्लॅटफॉर्म यांच्यावर 40 टक्के कर लागू राहील. तसेच हिरे आणि किंमती रत्नांचा जीएसटी दर कमी करण्यात आलेला नाही. त्यामुळे ते महागच असणार आहेत.