love jihaad l ‘लव जिहाद’ कायद्यावरून शिवसेनेची भूमिका स्पष्ट, म्हणाले…

बिहारमध्ये नितीश कुमार Nitesh kumar जेव्हा लव जिहादचा कायदा आणतील त्या कायद्याचा आम्ही अभ्यास करू

Shivsena-mp-sanjay-raut-taunt-bjp-amravati-nagpur-aurangabad-nashik-and-konkan-mlc-election-news-update-today
Shivsena-mp-sanjay-raut-taunt-bjp-amravati-nagpur-aurangabad-nashik-and-konkan-mlc-election-news-update-today

मुंबई l भाजपाशासित राज्यांमध्ये लव जिहाद कायद्यावरून love jihaad जोरदार वातावरण तापले आहे. महाराष्ट्रात लव जिहादच्या घटना रोखण्यासाठी कायदा करण्यात यावा, अशी मागणी भाजपा नेत्यांकडून केली जात आहे. बिहारमध्ये नितीश कुमार Nitesh kumar जेव्हा लव जिहादचा कायदा आणतील. त्या कायद्याचा आम्ही अभ्यास करू. असं उत्तर शिवसेना खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी दिलं आहे.

मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये लव जिहाद विरोधात कायदा केला जाणार असल्याची चर्चा असून, महाराष्ट्रातही हा मुद्दा उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्रात लव जिहादच्या घटना रोखण्यासाठी कायदा करण्यात यावा, अशी मागणी भाजपा नेत्यांकडून केली जात आहे. भाजपाच्या मागणीला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी उत्तर देत आव्हान दिलं आहे.

“विकास हाच निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा असतो. पण, लव जिहादचा मुद्दा समोर आला आहे. त्याचं स्वागत करतो. महाराष्ट्रात कायदा कधी होणार असं काही नेते म्हणत आहेत. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात कायदा केला जाणार आहे. राज्यातील काही भाजपाचे जे प्रमुख नेते विचारत आहेत की, महाराष्ट्रात कायदा कधी होणार? माझी आज सकाळी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. 

हेही वाचा : …त्यासाठी भाजपला संपूर्ण मुंबईची कोरोना दफनभूमी करायची; शिवसेनेचे भाजपावर टीकास्त्र

या विषयावर आम्ही इतकं सांगू की, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात कायदा होऊ द्या. पण, बिहारमध्ये नितीश कुमार जेव्हा लव जिहादचा कायदा आणतील. त्या कायद्याचा आम्ही अभ्यास करू. त्यानंतर महाराष्ट्रात कायदा आणण्याविषयी विचार करू. बिहारमध्ये भाजपाचं सरकार आहे. नितीश कुमार भाजपाचेच मुख्यमंत्री आहेत. कारण सर्वात जास्त जागा भाजपाच्या आहेत. नितीश कुमार तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री भाजपाचाच आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून देशात आणि महाराष्ट्रात लव्ह जिहाद विषयावर महाराष्ट्रातला विरोधी पक्ष, तसंच देशात जिथे भाजपाची सत्ता नाही तिथे लव्ह जिहादसंबंधी कायदा करा अशी मागणी होत आहे. बहुधा पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी हे होत आहे. मी यासंबंधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात कायदा होतोय.

महाराष्ट्रात करा असा हट्ट केला जात आहे. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशचं राहू दे…बिहारमध्ये नितीश कुमार जवळजवळ भाजपाचेच मुख्यमंत्री आहेत. बिहारमध्ये सर्वात आधी कायदा करा. तिथे नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली जो कायदा बनवला जाईल त्याचा अभ्यास करु आणि नंतर महाराष्ट्रात विचार करु. राज्यात लव्ह जिहाद नव्हे, तर करोनाचं संकट मोठं आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

अर्थव्यवस्था सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. बेरोजगारी, महागाई या मुद्यांपेक्षा मोठा लव जिहाद असेल, तर आधी बिहारमध्ये कायदा होऊ द्या. अभ्यास करून महाराष्ट्रात कायदा करण्याचा विचार करू. पंतप्रधानांचं म्हणणं भाजपा नेत्यांना समजत नाहीये. दुसऱ्या महायुद्धापेक्षाही भयंकर संकट असल्याचं पंतप्रधान सांगत आहेत. पण, महाराष्ट्रात भाजपाचेच नेते पंतप्रधानांचंच ऐकत नाहीयेत. उलट आंदोलन करत आहेत. रस्त्यावर उतरत आहे, जसं काही हे करोनाचेच बाप आहेत,” असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here