मुंबई: राज्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी वाढ दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात आता पुन्हा एकदा लॉकडाउन लागतो की काय अशा चर्चा सुरू आहेत. प्रशासनाकडून निर्बंध अधिकच कडक केले जात आहेत. लसीकरण मोहीम देखील सुरू आहे. मात्र तरी देखील कोरोनाचे रूग्ण मोठ्या संख्येने आढळून येत असल्याने, सरकारसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, आज दिवसभरात राज्यात ४३ हजा १८३ नवीन कोरोनाबाधित वाढले असून, २४९ रूग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. maharashtra- Coronavirus -reports-43183-new-covid-19-cases-249-deaths-in-the-last-24-hours-news-updates
राज्यातील मृत्यू दर १.९२ टक्के आहे. तर, राज्यात आज रोजी एकूण ३,६६,५३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, आज ३२ हजार ६४१ रुग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २४,३३,३६८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८५.२ टक्के एवढे झाले आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९९,७५,३४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २८,५६,१६३ (१४.३० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १९,०९,४९८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १८,४३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३,६६,५३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनाच्या चाचण्यांचे दर कमी करून राज्य सरकारने नागरिकांना काहीसा दिलासा दिला आहे. राज्यात आता नव्या दरांनुसार करोना चाचणीसाठी ५०० रुपये आकारले जाणार आहेत. याआधी ज्या चाचणीसाठी ७०० रुपये दर आकारले जात होते, ती चाचणी आता फक्त ५०० रुपयांमध्ये करता येणार आहे. सर्व खासगी प्रयोगशाळांना करोना चाचणीचे हे दर लागू असतील.
यासोबतच रॅपिड अँटिजेन टेस्टच्या दरांमध्ये देखील कपात करण्यात आली असून आता ही चाचणी फक्त १५० रुपयांमध्ये करता येणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही घोषणा केली आहे. राज्यातील कोणत्याही खासगी प्रयोगशाळेला यापेक्षा जास्त दर आकारता येणार नाहीत, असं देखील आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.



















































































































































































