MNS : मनसे नेते संदीप देशपांडेंसह चार जणांना रेल्वे पोलिसांनी केली अटक

mns-sandeep-deshpande-and-four-other-leaders-arrested-railway-police
संदीप देशपांडेसह चार जणांना अटक mns-sandeep-deshpande-and-four-other-leaders-arrested-railway-police

मुंबई : कोरोनाच्या पार्श्बभूमीवर सध्या मुंबईतील लोकल सेवा बंद आहे. अतिआवश्यक सेवेतील कर्मचा-यांसाठी लोकलसेवा सुरु आहे. सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा सुरु करावी या मागणीसाठी मनसेनं सविनय कायदेभंग करण्याचा इशारा दिला होता. सोमवारी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह मनसे पदाधिकाऱ्यांनी लोकलमधून प्रवास करत सविनय कायदेभंग आंदोलन केले होते. या प्रकरणी संदीप देशपांडे यांच्यासह चार जणांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा : मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सोमवारी केला होता प्रवास click करा

रेल्वे पोलिसांनी चकमा देत सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आले होते. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे, संतोष धुरी, गजानन काळे आणि अतुल भगत यांनी लोकलने प्रवास केला होता. त्यानंतर संदीप देशपांडे यांनी एक व्हिडिओ टाकला होता. मनसे सैनिकांनी रेल्वेने प्रवास केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना कर्जत चारफाटा येथे पोलिसांनी अटक केली.

रेल्वे प्रवास करणार दिला होता इशारा

मनसेनं लक्ष वेधत लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठीही खुला करण्याची मागणी केली होती. “लॉकडाउनमध्ये रेल्वे सेवा बंद आहे. मात्र बससेवा सुरु करण्यात आली आहे. बसमध्ये लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. लोकांना आपापल्या घरी पोहोचण्यासाठी आठ तासांचा कालावधी लागत आहे. कल्याण, डोंबिवली, पालघर या ठिकाणांहून येणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. सरकारला विनंती केली परंतु ते ऐकत नाहीत. त्यामुळे येत्या सोमवारी मनसेतर्फे सविनय कायदे भंग करत आम्ही रेल्वे प्रवास करणार आहे,”असं देशपांडे म्हणाले होते.

पोलिसांच्या नाकावर टिच्चून रेल्वे प्रवास

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी लोकलमधून प्रवास केला. यावेळी प्रवासाचा व्हिडीओ देशपांडे यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली. “आम्ही अनेकवेळा सरकारला विनंती केली होती की सर्वसामान्यांसाठी रेल्वे चालू करा. बसमध्ये करोना पसरत नाही, पण लोकलमधून पसरतो, असा सरकारचा समज झाला असावा. आम्ही कायदेभंगाची हाक दिली होती. त्याप्रमाणे नाकावर टिच्चून आम्ही हा रेल्वे प्रवास करत आहोत, जय महाराष्ट्र,” अशी टीका देशपांडे यांनी सरकारवर केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here