Maratha reservation : मराठा आरक्षणासंदर्भात सोमवारी नवी दिल्लीत वकिलांची बैठक

Now we will inform the government of the next decision on December 24, Jarange Patil is firm on his position
Now we will inform the government of the next decision on December 24, Jarange Patil is firm on his position

मुंबई : सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या Maratha reservation पुढील सुनावणीच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी ११ जानेवारी रोजी नवी दिल्लीत बैठक होणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण Ashok chavan यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.

बैठकीला ‘हे’ नेते उपस्थित राहणार

सोमवार, ११ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता दिल्लीच्या नवीन महाराष्ट्र सदनामध्ये होणाऱ्या या बैठकीला उपसमितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, अनिल परब यांच्यासह राज्य शासनाने नेमलेले वरिष्ठ विधीज्ञ, शासकीय तसेच खासगी याचिकाकर्त्यांचे वकील उपस्थित राहणार आहेत. 

Happy birthday Hrithik Roshan:हृतिकच्या वाढदिवसानिमित्त सुझान खानने शेअर केला ‘हा’खास व्हिडीओ

मराठा समाज व शासकीय वकिलांमध्ये समन्वय साधण्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या पाच खाजगी वकिलांच्या समितीचे सदस्यदेखील या बैठकीत ऑनलाइन सहभागी होणार आहेत.

हेही वाचा : देशात नक्की कोणती शाही’?;संजय राऊतांचा भाजपला सवाल

मराठा आरक्षणाबाबत येत्या २५ जानेवारीपासून दैनंदिन स्तरावर नियमित सुनावणी करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणीत जाहीर केले होते.

हेही वाचा : उध्दव ठाकरे म्हणाले, पीडित कुटुंबाच्या सांत्वनासाठी शब्दही नव्हते, केवळ हात जोडून उभा राहिलो

त्यानुसार राज्य सरकार आपल्या रणनितीवर अंतिम हात फिरवत असून, आजवर झालेल्या तयारीची समिक्षा केली जातं आहे.

हेही वाचा: शरद पवारांना हवी सुरक्षेत कपात, गृहमंत्र्यांना फोन करुन म्हणाले…

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here