Audi ची भारतात ‘ही’ सर्वात फास्ट SUV लाँच!

लग्जरी फीचर्स, स्पीड आणि स्पोर्टी लूक

audi-launches-rs-q8-its-most-powerful-suv-
audi-launches-rs-q8-its-most-powerful-suv-

नवी दिल्ली : जगप्रसिध्द लग्झरी कार बनवणारी जर्मनी कंपनी Audi ने भारतीय बाजारातील आपली सर्वात पॉवरफुल आणि फास्ट एसयूव्ही Audi RS Q8 लाँच केली आहे. अत्यंत आकर्षक लूक आणि दमदार इंजिन क्षमता असलेल्या Audi RS Q8 या एसयूव्हीमध्ये कंपनीने लग्जरी फीचर्स आणि स्पोर्टी लूक दिलं आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 2.07 कोटी रुपये आहे.

600 hp चा दमदार पॉवर इंजिन

नवीन Audi RS Q8 मध्ये कंपनीने 4.0 लिटर क्षमतेच्या TFSI इंजिनचा प्रयोग केला आहे. हे इंजिन 600 hp ची दमदार पॉवर आणि 800 Nm पीक टॉर्क निर्माण करतं. यामध्ये माइल्ड हाइब्रिड सिस्टिमचाही वापर केला आहे. याद्वारे कारच्या मायलेज आणि परफॉर्मन्स दोन्हीमध्ये सुधारणा होते. ही कंपनीकडून भारतीय बाजारात लाँच करण्यात आलेली आतापर्यंतची सर्वात फास्ट SUV आहे.

स्पीड 3.8 सेकंदात 0 ते 100 चा वेग

चार सेकंदांपेक्षा कमी वेळेत (3.8 सेकंद) ही गाडी शून्य ते 100 किलोमीटर प्रतितासाचा वेग पकडते असा कंपनीचा दावा आहे. याशिवाय या कारचा टॉप स्पीड 250 किलोमीटर प्रतितास आहे. पण कंपनी या एसयूव्हीमध्ये ‘डायनॅमिक पॅकेज प्लस’चाही पर्याय देते, याद्वारे RS Q8 एसयूव्हीचा टॉप स्पीड 305 किलोमीटर प्रतितास पोहोचतो. कंपनीने या कारमध्ये 23 इंच डायमंड कट एलॉय व्हील दिले आहेत. याशिवाय कंपनीने यामध्ये अनेक पैसा वसूल ठरावेत असे अनेक शानदार फीचर्स दिले आहेत.

हेे आहेत जबरदस्त फीचर्स

Audi RS Q8 मध्ये ऑल व्हील स्टीअरिंग, रूफ स्पॉइलर, ऑडीचे व्हर्चुअल कॉकपिट, सेल्फ लॉकिंग डिफ्रेंशिअल, स्पोर्ट एडप्टिव्ह सस्पेन्शन आणि 4 झोन क्लायमेट कंट्रोल यांसारखे अनेक फीचर्स आहेत. याशिवाय हेड अप डिस्प्ले, मॅट्रिक्स LED हेडलाइट, स्पोर्ट एग्जॉस्ट, एडव्हान्स साउंड सिस्टिम आहे. यातील साउंड सिस्टिममुळे 3D सराउंड साउंडचा अनुभव मिळतो. या कारमध्ये कंपनीने सिलिंडर ऑन डिमांड (COD) तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, याद्वारे चालकाला सिलिंडर ऑफ करण्याची सुविधा मिळते. यामुळे इंधनाचा वापर कमी होतो आणि कारचा मायलेज वाढतो. या कारमध्ये कंपनीकडून 8 स्पीड गिअरबॉक्स स्टँडर्ड आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here