Bird flu in Maharashtra : महाराष्ट्रात कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड-फ्लूने’च;मुख्यमंत्र्यांनी बोलावली आज बैठक

महाराष्ट्रात पक्षी-कोंबडय़ांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच,भोपाळच्या राष्ट्रीय प्रयोग शाळेची माहिती

maharashtra-become confirm bird flu-on-maximum-alert-cm-uddhav Thackeray-todays-meeting
maharashtra-become confirm bird flu-on-maximum-alert-cm-uddhav Thackeray-todays-meeting

परभणी: देशातील मध्य प्रदेश, हरियाणा, केरळसारख्या राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर आता हे संकट महाराष्ट्रातही धडकलं आहे.Bird flu in Maharashtra राज्यातील परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावात तब्बल 1000 कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच Bird flu झाला. अशी माहिती भोपाळच्या राष्ट्रीय प्रयोग शाळेने दिली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी Uddhav thackeray तातडीने बैठक बोलावली आहे.

मुरुंबा गावात तीन दिवसात 1000 कोंबड्याचा मृत्यू झाला आहे, सेलू तालुक्यातील कुपटा गावात 8 दिवसात 500 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील बडनेरामध्ये 40 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे.   

परभणी तालुक्यातील मुरुंबा गावातील कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

परभणी तालुक्यातील मुरुंबा गावातील कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची माहिती, तीन दिवसात 1 हजार कोंबड्यांचा झाला होता मृत्यू

सात राज्यांमधील स्थिती

हरियाणाच्या पंचकुला जिल्ह्य़ातील दोन कुक्कुटपालन केंद्रांतून संकलित केलेल्या नमुन्यांच्या अहवालातून कोंबडय़ांना ‘बर्ड फ्लू’चा संसर्ग झाल्याचे राज्य सरकारने जाहीर केले. त्यामुळे तेथे नऊ शीघ्र प्रतिसाद दले तैनात करण्यात आली असून, साथ प्रतिबंधात्मक उपाययोजनाही केल्या जात असल्याचे  केंद्रीय पशूपालन मंत्रालयातर्फे सांगण्यात आले.

गुजरात आणि राजस्थानमध्येही ‘बर्ड फ्लू’ची साथ पसरल्याचे निष्पन्न झाले. गुजरातमधील सूरत जिल्ह्य़ातून आणि राजस्थानच्या सिरोही जिल्ह्य़ातून संकलित केलेल्या पक्ष्यांच्या नमुन्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा विषाणू आढळला.

हिमाचल प्रदेशातील कांग्रा जिल्ह्य़ातही ८६ कावळे आणि दोन बगळे मृतावस्थेत आढळले. नहान, बिलासपूर आणि मंडी जिल्ह्य़ातूनही मृतावस्थेत आढळलेल्या पक्ष्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचे पशुपालन विभागाच्या निवेदनात म्हटले आहे.

साथीचा फैलाव झालेल्या केरळच्या दोन्ही जिल्ह्य़ांमध्ये साथ नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत, असे केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आले. मध्य प्रदेशातील १३ जिल्हे ‘बर्ड फ्लू’बाधित झाले आहेत.

छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्य़ातून घेतलेले पक्ष्यांच्या नमुन्यांचा अहवाल आला असून तेथे बर्ड फ्लूची साथ नसल्याचे पशूपालन आणि दुग्धविकास मंत्रालयाने निवेदनाद्वारे स्पष्ट केले.

या आहेत मार्गदर्शक सूचना 

‘बर्ड फ्लू’ साथीचा फैलाव झालेल्या सातही राज्यांना साथप्रतिबंध आणि नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्याची माहिती केंद्रीय पशूपालन मंत्रालयाने रविवारी दिली.

केंद्राच्या राज्यांना सूचना

’‘बर्ड फ्लू’बाबतच्या अफवांना आळा घालण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी

’जलसाठे, कोंबडी बाजार, कुक्कुल पालन केंद्रे, प्राणिसंग्रहालये इत्यादी ठिकाणी दक्षता घ्यावी

’मृत पक्षी-प्राण्यांची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावावी. कुक्कुट पालन केंद्रांची जैवसुरक्षा मजबूत करावी

नऊ केंद्रीय पथके सक्रिय

’‘बर्ड फ्लू’बाधित भागांतील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय पथके स्थापन करण्यात आली असून ती त्या त्या भागांची पाहणी करीत आहेत, असे केंद्राने सांगितले.

’एक केंद्रीय पथक शनिवारी केरळमध्ये पोहोचले. या पथकाने तेथील परिस्थितीचे निरीक्षण करून साथसंशोधन सुरू केले आहे.

’आणखी एक केंद्रीय पथक रविवारी हिमाचल प्रदेशातील बाधित भागात दाखल झाले असून तेथे सर्वेक्षण सुरू केले आहे.

अहवाल पाठवण्याचे प्राणिसंग्रहालयांना आदेश

नवी दिल्ली : सात राज्यांमध्ये १२००हून अधिक पक्षी मृतावस्थेत आढळल्यानंतर केंद्राने तेथे ‘बर्ड फ्लू’चा उद्रेक झाल्याचे जाहीर केले. त्यामुळे देशातील सर्व प्राणिसंग्रहालयांनी तेथील परिस्थितीचा दैनंदिन अहवाल केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाला पाठवावा, असे आदेश केंद्र सरकारने रविवारी दिले.

चेंबूरमध्ये नऊ कावळे मृतावस्थेत

मुंबईतील चेंबूर परिसरातील टाटा कॉलनीजवळ नऊ कावळे रविवारी मृतावस्थेत आढळले. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी  मृत कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले. तपासणी अहवाल आल्यानंतर या कावळ्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

हेही वाचा l Maratha reservation : मराठा आरक्षणासंदर्भात सोमवारी नवी दिल्लीत वकिलांची बैठक

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here