Mumbai Corona Update l उद्रेक: मुंबईत २४ तासांत ५ हजार १८५ नवे रुग्ण सापडले

mumbai-corona-update-5185-new-cases-found-covid-19-news-updates
mumbai-corona-update-5185-new-cases-found-covid-19-news-updates

मुंबई: मुंबईत आज बुधवारी कोरोनाचा उद्रेक झाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये आत्तापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ झाली आहे. दिवसभरात मुंबईत तब्बल ५ हजार १८५ नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. दिवसभरात मुंबईत ६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा आता ११ हजार ६०६ वर पोहोचला आहे. मुंबईकरांची चिंता वाढवणारी बाब ठरली आहे.mumbai-corona-update-5185-new-cases-found-covid-19-news-updates

पालिकेकडून जारी करण्यात आलेल्या आजच्या आकडेवारीनुसार मुंबईत दिवसभरात ५ हजार १८५ नवे कोरोनाबाधित सापडले असून मुंबईतल्या एकूण बाधितांची संख्या आता ३ लाख ७४ हजार ६११ इतकी झाली आहे. त्यापैकी ३० हजार ७६० अ‍ॅक्टिव्ह रुग्ण सध्या मुंबईत आहेत.

हेही वाचा: चिंताजनक:  देशात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ महाराष्ट्रात

आजपर्यंत झालेली ही सर्वात मोठी रुग्णवाढ ठरली आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईत सातत्याने ३ हजारांच्या वर रुग्ण सापडत असताना आज अचानक ही रुग्णवाढ ५ हजारांच्या वर गेली आहे.

मुंबईचा रिकव्हरी रेट देखील गेल्या महिन्याभरापासून ९० टक्क्यांच्या आसपासच रेंगाळत असून त्यामध्ये फारशी वाढ होताना दिसत नाहीये. या पार्श्वभूमीवर मुंबईत काही प्रमाणात निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. मात्र, सरसकट लॉकडाऊन आणि मुंबई लोकल बंद करण्याचा कोणताही विचार सध्या पालिकेसमोर नाही, असं अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here