मुंबई पोलीस आयुक्तांची बदनामी प्रकरणी अखेर दोन गुन्हे दाखल

सायबर सेलच्या पोलीस उपआयुक्त रश्मी करंदीकर यांची माहिती

former-mumbai-police-commissioner-parambir-singh-fled-country-suspects-nia-state-government-news-update
former-mumbai-police-commissioner-parambir-singh-fled-country-suspects-nia-state-government-news-update

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर एम्सच्या अहवालानंतर मोठा खुलासा झाला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुंबई पोलिसांचं खच्चीकरण व बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला, असं म्हटलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर परमबीर सिंग यांची बदनामी केली गेली. याप्रकरणी मुंबई सायबर सेलनं दोन गुन्हे दाखल केले आहेत.

सायबर सेलच्या पोलीस उपआयुक्त रश्मी करंदीकर यांनी माहिती दिलेल्या माहितीनुसार, “ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरील अनेक अकाऊंटधारक मुंबई पोलीस आयुक्तांना ट्रोल करत आहेत. त्यांच्याविरोधात अपशब्दाचा वापर केला जात आहे. त्यामुळे या अकाऊंटधारकांवर आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही खाती बनावट आहेत आणि पोलिसांकडून त्या सर्व बनावट खातेदारांवर कारवाई केली जाईल,” असं करंदीकर म्हणाल्या. “दुसरा गुन्हा मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलचा फोटो वापरणाऱ्यांवरही दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणांची चौकशी सुरू केली आहे,” असं त्यांनी सांगितलं.

सुशांत आत्महत्या प्रकरणारा तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटून गेला आहे. मुंबई पोलिसांकडून हा तपास भाजपच्या मागणीनंतर सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. परंतु एम्सने सीबीआयकडे सोपवलेल्या अहवालावरही सुशांतची हत्या नव्हे आत्महत्या आहे असा रिपोर्ट सादर केला. त्यामुळे भाजपची गोची झाली आहे. परंतु या संपूर्ण तपासादरम्यान भाजपच्या मंडळीकडून सरकारची बदनामी करण्यात आली.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सुरूवातीला मुंबई पोलिसांनी सुरू केला होता. मात्र, मुंबई पोलिसांना आणि पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या तपासाला बदनाम करण्यासाठी त्या काळात सोशल मीडियावर तब्बल ८० हजार फेक अकाऊंटस् सुरू करण्यात आली होती. त्यामाध्यमातून बदनामी केली गेली, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

वाचा : धक्कादायक सुशांत प्रकरणात 80 हजार फेक अकाऊंसव्दारे मुंबई पोलिसांची बदनामी

मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं यासंदर्भात एक अहवाल तयार केला असून, त्यात सुशांतची आत्महत्या व मुंबई पोलीस, महाराष्ट्र सरकारची बदनामी करणाऱ्या पोस्टचा उल्लेख करण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममधून पोस्ट शेअर करण्यात आलेली ही फेक अकाऊंटस् फक्त भारतातीलच नाही. इटली, जपान, पोलंड, स्लोव्हेनिया, इंडोनेशिया, तुर्की, थायलंड, रोमानिया आणि फ्रान्स आदी देशातूनही या पोस्ट करण्यात आल्या आहेत.

मुंबई पोलिसांची अश्लाघ्य भाषेत बदनामी करणारे असंख्य फेक अकाऊंटस् उघडण्यात आली. सायबर सेल या संपूर्ण प्रकरणाची तपास करत आहे. कायद्याचा भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असं मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here