राशीभविष्य : शनीच्या कुंभ राशीमध्ये चंद्राचा संचार,पाहा शनिवार कसा जाईल

rashibhavishya-marathi-todays-horoscope-16-october-rashifal-update
rashibhavishya-marathi-todays-horoscope-16-october-rashifal-update

आज दिनांक 16  ऑक्टोबर 2021. शनिवार अश्विन शुद्ध एकादशी. आज चंद्र  कुंभ राशीत प्रवेश करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

दिवस अत्यंत शुभ असून ग्रह तुमच्यावर प्रसन्न आहेत. आर्थिक, धार्मिक,सामाजिक पातळीवर तुम्ही चमकणार आहात. प्रसिद्धी मिळेल.मात्र  गृह कलहामुळे मन उद्विग्न होईल. मत्सरी लोकांना दूर ठेवा.

वृषभ

आज  कार्यालयीन  काम सुरळीत पार पडेल. जास्त श्रम पडले तरी यश मिळेल. घरांमधे काही जबाबदारी येईल. ती तुम्ही व्यवस्थित पार पाडाल. अति संवेदनशील  होणे टाळा. दिवस शुभ आहे.

मिथुन

राशीच्या भाग्य स्थानात चंद्र ,आध्यात्मिक प्रगती साठी मदत करतील. छोटे प्रवास संभवतात. मौल्यवान वस्तु प्राप्त होतील. संतती सुख चांगले. आर्थिक स्थिती ठीक राहील. दिवस उत्तम.

कर्क

आज अष्टमात चंद्र  वाचन, अभ्यास इत्यादी मध्ये यश देतील. आर्थिक स्थिती ठीक राहील. अचानक लाभ होईल. भावंडाची भेट होईल.  प्रकृती जपा. पोटाचे त्रास संभवतात.  दिवस  मध्यम.

सिंह

या राशीच्या व्यक्तींना हा काळ मान मिळवून देणारा आहे. प्रतिष्ठा वाढेल. भावंड खुश राहतील. आर्थिक उलाढाली होतील. जोडीदाराला वेळ द्यावा लागेल.  नवीन व्यवसाय पूरक घटना घडतील. दिवस चांगला.

कन्या

कन्या राशीत प्रवेश केलेला रवि लिखाण वाचन  यात शुभ फळ देईल. बुद्धी चा उत्तम वापर करून यश मिळवा .सौंदर्य प्रसाधन खरेदी होतील. आर्थिक स्थिती ठीक राहील. दिवस चांगला.

तुला

संतती कडुन शुभ वार्ता कळतील.व्यय स्थानात मंगळ आर्थिक उलाढाल वाढवेल. भरभराटीचा दिवस आहे. मात्र कायद्याचे उल्लंघन करू नका. सामाजिक जबाबदाऱ्या जपून घ्या. आर्थिक नियोजन नीट करा. दिवस बरा जाईल.

वृश्चिक

आज घरात होणार्‍या काही समारंभाची तयारी, आखणी कराल. त्यानिमित्त खरेदी होईल. कार्यक्षेत्रातील प्रगती सुरू राहील. आर्थिक बाजू ठीक राहील. दिवस चांगला जाईल.

धनु

छोटे प्रवास, गाठीभेटी, संवाद असा हा दिवस आहे. मनोरंजनात्मक कार्यक्रम ठरतील. कुटुंब सुख मिळेल. आर्थिक बाजू जपा. काहींना भावंडाची साथ मिळेल. दिवस चांगला.

मकर

आज आर्थिक व्यवहार, अचानक धनलाभ असा दिवस आहे. मात्र प्रकृती बाबत काळजी घ्या. कुटुंब,वाणी आत्मविश्वास पूर्ण राहील. दिवस चांगला.

कुंभ

राशीतील  चंद्र सुखद अनुभव देणार आहेत. आध्यात्मिक प्रगती होईल. अष्टमात  ग्रह सावधगिरीचा इशारा देताहेत . घरातील शांतता भंग होऊ नये म्हणुन सजग रहा. कुठेही अनावश्यक खर्च टाळा. दिवस शुभ.

मीन

धार्मिक समारंभ, नातेवाईकांच्या गाठी भेटी, त्यानिमित्ताने खर्च, देणेघेणे पार पडेल. प्रकृती जपा. आर्थिक बाजु ठीक राहील. शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाही. दिवस मध्यम जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here