खंडणी प्रकरण: किरीट सोमय्या आता गप्प का?;राष्ट्रवादीचा सवाल

ncp-leader-mahesh-tapase-attacks-on-kirit-somaiya-over-mumbai-police-interrogate-neil-somaiya-in-extortion-case/
ncp-leader-mahesh-tapase-attacks-on-kirit-somaiya-over-mumbai-police-interrogate-neil-somaiya-in-extortion-case/

मुंबईः भाजप नेते  किरीट सोमय्या kirit-somaiya यांचे पुत्र व नगरसेवक नील सोमय्या Neil-somaiya हे चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. नील सोमय्यांची खंडणीच्या एका जुन्या प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं Ncp किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे.

किरीट सोमय्या यांच्याकडून सातत्याने राज्यातील महाविकास आघाडीला लक्ष्य करण्यात येत होते. शिवसेना नेत्यांवर किरीट सोमय्या सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करत होते. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी किरीट सोमय्यांना या प्रकरणी घेरलं असून आता सोमय्या गप्प का?, असा सवाल केला आहे.

किरीट सोमय्या यांच्या मुलाची खंडणीप्रकरणी चार तास कसून पोलिस चौकशी झाली आहे. यावर आता किरीट सोमय्या गप्प का?, असा त्यांनी केला आहे. तसंच, ज्याला कर नाही त्याला डर कशाची, असा प्रश्नही आमच्या मनात येतो. यासंबंधी किरीट सोमय्या यांनी त्यांच्या मुलाच्या संदर्भातील भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी तपासे यांनी केली आहे.

Gazalkar Ilahi Jamadar| प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांचं निधन, वयाच्या 74व्या वर्षी अखेरचा श्वास

जाणून घ्या संपूर्ण प्रकरण?

भाजप नगरसेवक नील सोमय्या यांचे नाव एका खंडणीच्या प्रकरणात आले होते. हे जुने प्रकरण असून याप्रकरणी नील यांची नव्याने चौकशी सुरू करण्यात आली आहे. मुलुंड पोलीस ठाण्यात नील यांचा जबाब नोंदवण्यात आला. नील यांच्यावर बिल्डरकडून खंडणी उकळल्याचा आरोप आहे.

हेही वाचा: धनंजय मुंडेंबद्दल इंदुरीकर महाराज यांचं मोठं विधान,म्हणाले…

यह भी पढ़ें: WhatsApp में एड हुए नए फीचर, Group Admin को मिली यह नई पावर

यह भी पढ़ें: भारत में 100% कैपिसिटी के साथ खुलेंगे सिनेमा हॉल, 1 फरवरी से लागू होगी नई S0P

हेही वाचा: ज्याने तिरंग्याचा अपमान केला त्याला पकडा; राकेश टिकैत यांचा पंतप्रधानांवर पलटवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here