फ्लेचर पटेल कोण आहे? समीर वानखेडेंचा त्यांच्याशी काय संबंध?; नवाब मलिकांचा सवाल

ncp-minister-nawab-malik-press-conference-fletcher-patel-ncb-news-update
ncp-minister-nawab-malik-press-conference-fletcher-patel-ncb-news-update

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पुन्हा एकदा एनसीबीवर निशाणा साधला आहे. फ्लेचर पटेल (fletcher patel) कोण आहे? अशी विचारणा नवाब मलिक यांनी केली आहे. यासोबतच नवाब मलिक यांनी ट्वीटरला फ्लेचर पटेल यांचे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे ( यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. फ्लेचर पटेल आणि समीर वानखेडे (Sameer wankhede)  यांच्यात काय संबंध आहेत? अशी विचारणा नवाब मलिक यांनी केली आहे. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत एनसीबीसमोर अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

“मनिष भानुशाली याने मी खबरी असल्याचं सांगितलं. गोसावी हा फरार आरोपी आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत २ तारखेच्या आधी आपण त्यांना ओळखत नव्हतो असं सांगितलं. स्वतंत्र पंच असल्याचं एनसीबीने सांगितलं असून मी त्याबाबतीत आज प्रश्न उपस्थित करत आहे.

एनसीबीने हा फ्लेचर पटेल कोण आहे याचा खुलासा करावा. समीर वानखेडे यांच्याशी त्यांचा काय संबंध आहे? त्यांच्या कुटुंबातील लोकांसोबत ते फोटो टाकत आहेत. माय लेडी डॉन सिस्टर नावाने टॅग करत आहेत. समीर वानखेडे यांचा या फ्लेचर पटेलशी काय संबंध आहे?,” अशी विचारणा नवाब मलिक यांनी केली आहे. फ्लेचर पटेल यांच्या प्रसिद्धीसाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे.

“कोणतीही केस उभी करायची असते तेव्हा ज्या ठिकाणी घटना घडते तेव्हा तेथील प्रतिष्ठीत नागरिक, आजुबाजूची लोक यांना बोलवून पंचनामा करणं कायदेशीर तरतूद आहे,” असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

 

“गेल्या एक वर्षातील माहिती घेतला असता एनसीबीने तीन केसेसमध्ये स्वतंत्र पंच म्हणून फ्लेचर पटेल यांचं नाव आहे. याचा अर्थ स्वतंत्र पंच यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत. ही कारवाई ठरवून केली असल्याचं हे यातून स्पष्ट होत आहे. कोर्टाने अनेकदा स्वतंत्र पंच अनेक केसमध्ये असल्यास यात तथ्य नाही असा निष्कर्ष काढला आहे. याचा अर्थ एनसीबीच्या माध्यमातून फर्जीवाडा सुरु आहे,” असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. फ्लेचर पटेल तीन केसमध्ये स्वतंत्र पंच कसे झाले याचं उत्तर दिलं जावं अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here