“हवाई चप्पल घालणाऱ्यांना विमान यात्रा घडवण्याची स्वप्न दाखवणाऱ्यांनी …”

अशोक चव्हाणांचा इंधन दरवाढीवरून मोदी सरकारवर निशाणा

Ashok Chavan is a coward, he ran away from the battlefield He stabled the Congress in the back by joining hands with the opposition Ramesh Chennithala's strong criticism
Ashok Chavan is a coward, he ran away from the battlefield He stabled the Congress in the back by joining hands with the opposition Ramesh Chennithala's strong criticism

मुंबई: पेट्रोल- डिझेलच्या दर Petrol Diesel price वाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आलेली आहे. तर, या मुद्यावरून विरोधी पक्ष आक्रमक झाले असून मोदी सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. राज्यात पेट्रोलचे दर शतकाच्या उंबरठ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते व राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण Ashok-chavan यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

” महाराष्ट्रात पेट्रोलचे दर शतकाच्या उंबरठ्यावर आहेत. कुणीतरी खरच म्हटलं आहे, हवाई चप्पल घालणाऱ्यांना विमान यात्रा घडवण्याची स्वप्न दाखवणाऱ्यांनी दुचाकी यात्रेच्याही लायक ठेवलं नाही.” असं अशोक चव्हाण यांनी ट्विट केलं आहे. तसेच, या ट्विसोबत त्यांनी आज मंगळवार (२३ फेब्रुवारी) परभणीतील ९९.४३ रुपेय प्रति लिटर हा पेट्रोलचा दर देखील दर्शवला आहे.

या अगोदर देखील पेट्रोल व डिझेलच्या दर वाढीवरून अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारवर जोरदार तोफ डागलेली आहे. ‘भारताच्या इतिहासात जे कधीही घडले नाही, ते आता मोदी सरकारच्या कारकिर्दीत घडणार असल्याचे दिसते आहे. महाराष्ट्रात पेट्रोलच्या दराचे शतक अवघे ९० पैसे दूर आहे’, असे ट्वीट करून त्यांनी या दरवाढीचा निषेध नोंदवलेला आहे.

वाचा: …अन्यथा इंग्लंडच्या क्रिकेट संघाला महाराष्ट्रात खेळू देणार नाही

देशात इंधनाच्या दरांचा भडका उडाला आहे. देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली आहे. तर दिल्लीमध्ये पेट्रोल ९० रुपये लिटरहून अधिक किंमतीला मिळत आहे.

मुंबईमध्येही पेट्रोलचे दर ९५ रुपये लिटरच्या पुढेच आहेत. याच इंधनदरवाढीवरुन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं होतं. याचसंदर्भात आता केंद्रीय तेल व वायूमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी उत्तर दिलं आहे. प्रधान यांनी इंधनाच्या दरांचा भडका का उडाला आहे यासंदर्भातली एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना भाष्य केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here