काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधी यांचे नाव निश्चित

violence-does-not-solve-any-problem-congress-leader-rahul-gandhis-call-for-peace-to-farmers
violence-does-not-solve-any-problem-congress-leader-rahul-gandhis-call-for-peace-to-farmers

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधी यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत याबाबत एकमताने निर्णय घेण्यात आला अशी माहिती समोर येत आहे.  राहुल गांधी यांच्या नावाची घोषणा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Rahul Gandhi will Become Congress President Sources)

काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरून बरेच महिने खल सुरु होता. आज सोमवारी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, नारायण स्वामी, भुपेश बघेल, कॅप्टन अमरिंदर सिंह उपस्थित आहेत. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरु होत आहे. ही बैठक सुरु झाल्यानंतर सोनिया गांधी यांनी आपला राजीनाम्याचा प्रस्ताव दिला.

त्यावेळी सोनिया गांधी यांनी राजीनामा देऊ नये अशी विनंती या बैठकीदरम्यान करण्यात आली. राहुल गांधी यांनी पुन्हा काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारावं अशी मागणी काँग्रेस कार्यकारीणीच्या बैठकीत करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधी आपण अध्यक्ष व्हा, अशी विनंती केली. राहुल गांधी यांनी पुन्हा राष्ट्रीय अध्यक्षपद स्विकारावं अशी विनंती काँग्रेस शासित राज्याच्या सर्व मुख्यमंत्री यांनी केली आहे. अध्यक्षपदाबाबत राहुल गांधी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here