…तर महाराष्ट्रातील सत्ता सोडू : विजय वडेट्टीवार

So leave power in Maharashtra: Vijay Vadettiwar
… So leave power in Maharashtra: Vijay Vadettiwar

नागपूर : काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सोनिया गांधी यांच्यानंतर राहुल गांधी यांना पसंती आहे. सोनिया गांधी यांनी संकटात काँग्रेसला सांभाळलं आहे. गांधी परिवारातील व्यक्ती राष्ट्रीय अध्यक्ष व्हावा. राहुल गांधी यांनी चर्चा करुन महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारला होकार दिला होता. अध्यक्ष झाल्यावर राहुल गांधी यांनी सरकारमधून बाहेर पडण्यास सांगितल्यास आम्ही सत्ता सोडू. असं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं. (Vijay Wadettiwar on CWC and Rahul Gandhi)

काँग्रेस अध्यक्षपदावरून काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद जोरदार पेटला आहे. नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. गांधी परिवारातील व्यक्ती राष्ट्रीय अध्यक्ष व्हावा. राहुल गांधी यांनी चर्चा करुन महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारला होकार दिला होता. अध्यक्ष झाल्यावर राहुल गांधी यांनी सरकारमधून बाहेर पडण्यास सांगितल्यास आम्ही सत्ता सोडू. काँग्रेसजन म्हणून आम्ही हायकमांडच्या निर्णयासोबत आहोत, असंही यावेळी वडेट्टीवार म्हणाले.

त्या 23 नेत्यांचे पत्र आणि वाद…

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना 23 नेत्यांनी पक्षाच्या पुनर्रचनेबाबत पत्र पाठवले आहे. काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष हवा असं या पत्रात म्हटलं आहे. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांचा समावेश असल्याचे बोललं जातं आहे.पंजाबमधून गांधी परिवाराबाहेरील अध्यक्ष निवडण्यास विरोध करण्यात आला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी याबाबत विरोध केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here