Raigad building collapse : तब्बल 18 तासांनंतर 6 वर्षांच्या मुलाला ढिगाऱ्याखालून सुखरूप काढलं बाहेर!

raigad-building-collapse-6-year-old-boy-was-pulled-out-safely-from-malba
raigad-building-collapse-6-year-old-boy-was-pulled-out-safely-from-malba

महाड : ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय आज रायगड जिल्ह्यातील महाड इमारत दुर्घटनेत आला. ढिगाऱ्याखालून 18 तासांनंतर सहा वर्षाच्या मुलाला सुखरुप बाहेर काढण्यात NDRFच्या जवानांना यश आलं आहे. ( raigad-building-collapse-6-year-old-boy-was-pulled-out-safely-from-malba) मात्र या चिमुकल्याच्या आईचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

सोमवारी संध्याकाळी महाडमधील तारिक गार्डन नावाची 5 मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. त्यामध्ये आतापर्यंत 60 पेक्षा जास्त नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. सध्या बचाव कार्य जोरात सुरु आहे. पोलीस आणि NDRF टीमकडून सोमवारी रात्रीपासून घटनास्थळावर चोख कामगिरी बजावत आहेत. आतापर्यंत 7 मृतदेह बाहेर काढण्यात आहे.

या दुर्घटनेप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या बिल्डरासह तत्कालीन मुख्याधिकारी, वास्तुविशारद, नगरपालिका इंजिनिअर आणि Rcc कन्सल्टन्स अशा पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. बिल्डर फारुक काजीला अटक करण्यात आली आहे.

या इमारतीत राहत होते 43 कुटुंब

या इमारतीमध्ये 43 कुटुंब राहात होती त्यापैकी 18 कुटुंबातील लोक कोरोनामुळे गावी गेले होते. घटनास्थळी  20 तासांपासून पोलीस, एनडीआरएफच्या मदतीनं मलबा हटवण्याचं काम सुरू आहे. या ढिगाऱ्याखाली 15 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून सध्या NDRF कडून त्यांचा शोध सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here