Mahad Building Collapse : मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख, तर जखमींना 50 हजारांची मदत

पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली घोषणा

Five lakh to the relatives of the deceased and Rs 50,000 to the injured
Five lakh to the relatives of the deceased and Rs 50,000 to the injured

रायगड : रायगड जिल्ह्यातील महाड शहरात सोमवारी (24 ऑगस्ट) रोजी भीषण इमारत दुर्घटना घडली (Raigad Mahad Building Collapse). यात 41 कुटुंब राहत होते. दुर्घटनेत आतापर्यंत 13 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख तर जखमींना 50 हजारांची मदत पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केले.

दुर्घटनेत तेरा जणांचा मृत्यू

1)सय्यद अमित समीर, वय 45 वर्ष.

2) नविद झमाने, वय 35 वर्ष

3) नाैसिन नदीम बांगी, वय 30 वर्ष

4) आदी हाशिम शैकनग, वय 16 वर्ष

5) अनाेळखी स्री चा मृतदेह

6) रोशनबी देशमुख, वय 56 वर्ष

7) ईस्मत हाशिम शैकनक, वय 42 वर्ष

8) फातिमा अन्सारी, वय 40 वर्ष

9) शौकत आदम अलसूलकर, वय 50 वर्ष अल्लतिमस बल्लारी, वय 27 वर्ष

10) अल्लतिमस बल्लारी, वय 27 वर्ष

मृतकांमध्ये सहा महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे.

निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे लोकांचे जीव गेले : विजय वडेट्टीवार

निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे लोकांचे जीव गेले आहेत. जे जबाबदार आहेत त्यांना कठोर शासन होईल. मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत केली जाईल. यामध्ये चार लाख रुपयांची मदत आणि पुनर्वसन खात्यातर्फे तर 1 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून देण्यात देण्यात येतील. जखमींना पन्नास हजार रुपयांची दिले जाणार. या घटनेत ज्यांनी आपलं घर गमावलं आहेत त्यांनाही आर्थिक मदत केली जाईल, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here