तापसी पन्नू ‘रश्मी रॉकेट’च्या चित्रीकरणासाठी रेडी

Tapsi Pannu will shoot 'Rashmi Rocket' after training
Tapsi Pannu will shoot 'Rashmi Rocket' after training

मुंबई : अभिनेत्री तापसी पन्नू एक महिना ट्रेनिंगनतर आगामी ‘रश्मी रॉकेट’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. (Tapsi Pannu will shoot ‘Rashmi Rocket’ after training) नोव्हेंबरमध्ये चित्रीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. नंदा पेरियासामी, अनिरुद्ध गुहा आणि कनिका ढिल्लन यांनी लिहिलेली ही कथा एका महिला धावपटूवर आधारित आहे.

ही एका गावातल्या तरुणीची कथा असून, ती वेगानं धावू शकते. त्यामुळे गावकरी तिला ‘रॉकेट’ म्हणून ओळखतात. तापसी म्हणाली, ‘मी या प्रोजेक्टमध्ये अगदी सुरुवातीपासून सहभागी आहे. या व्यक्तिरेखेत शिरण्यासाठी करोनाच्याच्या आधी मी तीन महिने प्रशिक्षण घेत होते. आता मोठा ब्रेक झाला आहे.

आता किमान एक महिनाभर ट्रेनिंग करावं लागेल आणि त्यानंतर चित्रीकरणाला सुरुवात होईल.’ आकर्ष खुराना या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना याची उत्सूकता लागलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here