औरंगाबाद : माथेफिरु मुलाने आईच्या डोक्यात कुऱ्हाड घालून हत्या केली. ही धक्कादाय घटना औरंगाबाद जिल्ह्यातील बाळपूर या गावात घडली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून अधिक चौकशी सुरु आहे. रमेश घुगे असं माथेफिरु मुलाचे नाव आहे.
आरोपी रमेश हा मनोरुग्ण असून त्याच्यावर औरंगाबादच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घडलेल्या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. शशिकलाबाई घुगे असं मृत आईचे नाव आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे.




















































































































































































