Hero Xpulse 200T चं BS6 व्हर्जन लाँच, पाहा किंमत आणि फिचर्स

hero-launches-bs-6-version-of-xpulse-200t-motorcycle-in-india-with-news-features-updates
hero-launches-bs-6-version-of-xpulse-200t-motorcycle-in-india-with-news-features-updates

भारतातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने Hero Motocorp आपल्या एक्सपल्स 200 टी Xpulse 200T मोटारसायकलचं बीएस 6 व्हर्जन भारतात लॉन्च केलं आहे. नवी Hero Xpulse 200T बीएस 6 ची दिल्लीत एक्स-शोरूम किंमत 1,12,800 रुपये आहे. बीएस 4 मॉडेलच्या तुलनेत अपडेटेड बीएस 6 मॉडेलची किंमत 17,300 रुपयांनी वाढली आहे.

दिल्लीत बीएस 4 मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 95,500 रुपये होती. Hero Xpulse 200T बाईक Xpulse रेंजचाच पुढचा भाग आहे. हिरोने नवीन 2021 Hero Xpulse 200T तीन कलर ऑप्शन्ससह सादर केली आहे. यामध्ये मॅट शिल्ड गोल्ड, पँथर ब्लॅक आणि स्पोर्ट्स रेड कलर स्कीमचा समावेश आहे. 

हेही वाचा : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता दीदी;शरद पवारांचा दावा

नवीन अपडेटेड हिरो Xpulse 200T मोटारसायकलमध्ये 199.6 सीसी, ऑईल-कूल्ड, सिंगल-सिलिंडर, इंधन-इंजेक्टेड इंजिन देण्यात आले आहे. 5-स्पीड गिअरबॉक्ससह येणारे हे इंजिन 18.1bhp 8,500 आरपीएम पॉवर आणि 6,500 आरपीएम वर 16.15Nm टॉर्क जनरेत करतं. नवीन अपडेटेड बाइकचे मेकॅनिकल स्पेसिफिकेशन्स बदलले आहेत. परंतु स्टाईल आणि लुक या आधीच्या बीएस 4 व्हर्जनप्रमाणेच आहे.

पाहा फीचर्स
XPulse 200T BS6 एलईडी हेडलाइट आणि टर्न बाय टर्न नेव्हिगेशनसह ब्लूटूथ-कनेक्टेड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सारख्या वैशिष्ट्यांसह सादर करण्यात आली आहे. बाईकच्या सस्पेन्शनबद्दल सांगायचे झाल्यास यामध्ये पुढच्या बाजूला पारंपारिक टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस सात-स्टेप अॅडजस्टेबल रियर मोनो शॉक दिले आहेत.

हेही वाचा: संभाजीराजेंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, वाचा जसंच्या तसं…

दोन्ही चाकांवर ब्रेकसाठी डिस्क ब्रेक उपलब्ध आहेत. मोटारसायकलमध्ये 276 मिमी अपफ्रंट आणि 220 मिमी रियर डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. यामध्ये स्टँडर्ड सिंगल-चॅनेल एबीएस (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम) देखील देण्यात आली आहे.

हेही वाचा : चंद्रकांत पाटील म्हणाले, नकारात्मक माहिती शेअर करायची इच्छा नव्हती,पण…

मोटरसायकलचा ग्राउंड क्लीयरन्स 177 मिमी इतका आहे आणि इंधन टाकीची क्षमता 13 लीटर इतकी आहे. 2021 Hero Xpulse 200T मध्ये फुल एलईडी हेडलाइट्स, एलईडी टेल लॅम्प, 17-इंच ब्लॅक अ‍ॅलोय व्हील्स, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here