सरकारचे विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याचे षडयंत्र!

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे पत्रकार परिषदेत आरोप

Betal MLA Sanjay Gaikwad's smile!: Nana Patole
Betal MLA Sanjay Gaikwad's smile!: Nana Patole

औरंगाबाद : महायुतीच्या अतंगर्त सर्वेमध्ये त्यांना जनतेने नाकारले आहे. महायुती १०० चा आकडा पार करणार नाही. त्यामुळे ते घाबरले आहेत. घाबरल्यामुळे विधानसभा निवडणुका पुढे ढकलून खोटे निर्णय घ्यायचे, त्यानंतर  निवडणूका घेण्याचा सरकारचा षडयंत्र सुरु आहे. असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. सोमवार 12 ऑगस्ट रोजी काँग्रेसच्या आढावा बैठकीसाठी ते औरंगाबाद शहरात आले होते. त्यावेळी औरंगाबाद जिमखाना क्लब येथे बोलत होते.

पुढे बोलतांना नाना पटोले म्हणाले की, महायुती सरकारकडून योजनांच्या घोषणांचा पाऊस सुरु आहे. सरकारने राज्यावर जवळपास १० लाख कोटीचा कर्जाचा डोंगर उभारला आहे. जन्माला येणा-या बाळावरही ७० हजाराचा कर्ज आहे. सरकारकडे देण्यासाठी पैसा नाही. मराठवाड्यात सात महिन्यात ५११ शेतक-यांनी आत्महत्या केल्या परंतु त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकारकडे पैसा नाही. महायुती सरकार हे शेतकरी विरोधी आहे. अशी टीका नाना पटोले केली.

महागाईच्या आगीत जनता जळत आहे. समृध्दीसाठी कोट्यवधी रुपये कर्ज करुन ठेवले. परंतु सत्तेमध्ये बसलेल्या नेत्यांचीच समृध्दी झाली. भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढले. ४० वर्ष समृध्दी महामार्गाला काही होणार नाही असे सांगितले होते. परंतु समृध्दीला तडे गेले आहेत. असेही नाना पटोले म्हणाले.

लाडकी बहिण योजनेला आमचा विरोध नाही. परंतु निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना ९ महिन्यापासून पैसे मिळाले नाही. लाडकी बहिण योजनेच्या पैसे द्या परंतु महागाई कमी करा. विज बील कमी करा. महागाई वाढत चालली आहे. हे सरकार भ्रष्ट मतिमंद सरकार आहे. त्यांना जनतेची काळजी नाही. राज्यात गुन्हेगारी वाढली, महिला बेपत्ता होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तीन वर्षापासून निवडणुका झाल्या नाही. प्रशासक कुणाचे ऐकत नाही. जनतेच्या घामाच्या पैशातून लूट सुरु आहे. विकास कामे खोळंबली आहे. त्यामुळे राज्याची वाट लागली आहे. हे सरकार तीन तोंडी सरकार आहे.

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, सरकार नांदेड ते गोवा शक्ती मार्ग बनवण्याचा डाव आहे. शेतक-यांच्या बागा उजडून हे सरकार रस्ते बनवण्याचा प्रयत्न सुरु होता परंतु त्याला आमचे खासदार छत्रपती शाहू महाराज, आमदार प्रतिक पाटील यांनी आंदोलन केले आहे. आम्ही हा रस्ता होऊ देणार नाही. असाही इशारा त्यांनी दिला.
—–
सरकार शेतकरी विरोधी – रमेश चेन्नीथला ( काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी )

हे सरकार शेतकरी विरोधी आहे. सर्वात जास्त आत्महत्या कृषिमंत्र्याच्या जिल्ह्यात झाल्या. शेतक-यांच्या समस्या सोडवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने काहीच पावले उचलले नाही. नवीन गुंतवणूक नाही. येथील उद्योग गुजरातला पळवले. देशाची, राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली आहे. रोजगार नाही. शेतक-यांच्या मालाला भाव नाही. आमच्याच जुन्या योजनांचे नाव बदलून हे सरकार योजना चालवत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here