Police Bharti 2022 : पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ जाहीर,20 हजार जागांसाठी 12 लाख अर्ज

police-recruitment-application-date-extended-till-15-december-2022-by-home-minister-maharashtra-devendra-fadnavis-news-update-today
police-recruitment-application-date-extended-till-15-december-2022-by-home-minister-maharashtra-devendra-fadnavis-news-update-today

मुंबई:राज्यात पोलिस भरतीची (Police Bharati 2022) तयारी करत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे. आता अर्ज भरण्यासाठी आता १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून फडणवीस यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.

राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत 11.80 लाख अर्ज प्राप्त झाले असल्याचे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे.

20 हजार जागांसाठी भरती…

राज्यात जवळपास 20 हजार जागांसाठी पोलीस भरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख 30 नोव्हेंबर आहे. दरम्यान पोलीस भरती प्रक्रियेसाठीच्या राज्य शासनाच्या वेबसाईटमध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यास मुदत वाढ द्यावी अशी मागणी उमेदवारांकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here