राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली २०२९ ला सत्तेत आल्यानंतर अदानी, अंबानींच्या कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करू: हर्षवर्धन सपकाळ.

प्रदेश काँग्रेस शिक्षक विभाग आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न

We will nationalize Adani and Ambani's companies after coming to power in 2029 under the leadership of Rahul Gandhi: Harshvardhan Sapkal.
We will nationalize Adani and Ambani's companies after coming to power in 2029 under the leadership of Rahul Gandhi: Harshvardhan Sapkal.

मुंबई: ईस्ट इंडिया कंपनीची संपत्ती ब्रिटिश सरकारपेक्षा प्रचंड वाढलीत्यावेळी ब्रिटिश सरकारने ती कंपनीच ताब्यात घेतली. लष्कराला तेल देण्यास तेल कंपन्यांनी नकार दिल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तेल कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णय घेतला तसेच बँकांचे राष्ट्रीयीकरणही केले. आता राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली २०२९ ला सत्तेत आल्यानंतर अदानी व अंबानीच्या कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करू असा दृढनिश्चय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला आहे.

काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत घर हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी खासदार कुमार केतकर,प्रदेश काँग्रेसच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख विश्वास उटगीरमेश भुतेकरगोपाळ झवेरीश्रीपाद लोटलीकरशिशिर ढवळेसुकुमार दामलेगोविंदराव मोहितेधर्मराज्य पक्षाचे राजन राजेसदानंद सावंतविजय कुलकर्णीसंतोष सावंतशैलेश सावंतसचिन परबआशिष शिंदेज्ञानेश्वर शेळकेयशवंत राणेगिरीश अष्टेकरअरुण पावसकरप्रविण पालवअशोक कुलकर्णीअनिल महाडिकसंजय मुंजजयेश शिगवणकोटीयनमीनल पवारदिनेश राणेविद्या चव्हाणमिलिंड रानडेदिपक भालेराव आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले कीकाँग्रेस नेते राहुल गांधी हे देशाची लोकशाहीगरीबकामगार व भूमिपुत्राच्या हक्कांसाठी राहुल गांधी लढत आहेतराहुल गांधी हेच देशात आशेचा किरण असून जनतेचा त्यांच्याबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला  आहे.मुंबई सारख्या शहरात घर खरेदी करणे सर्वसामान्य लोकांच्या हाताबाहेर गेले आहेसरकार मुंबईतील जमिनी अदानीला विकत आहे आणि सर्वसामान्य जनतेला परवडणारी घरे मिळाली पाहिजे यासाठी काम करणे गरजेचे आहे. घराचे छप्पर असावे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कटीबद्ध आहेतघरांसाठी तुम्ही भूमिका ठरवा काँग्रेस तुमच्या पाठीशी असेल असा विश्वासही हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.

यावेळी सर्व मान्यवरांनी परवडणारी घरे या विषयावर संबोधन करत भाजपा सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली.

आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा..

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शिक्षक विभाग आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा पार पडला. राज्यभरातून आलेल्या आदर्श शिक्षकांना या सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. यावेळी शिक्षक आमदार जयंत आसगावकरआ. साजिद खान पठाण,  शिक्षक विभागाचे अध्यक्ष प्रा. प्रकाश सोनावणेकार्याध्यक्ष प्रकाश तायडेसचिन दुर्गाडे,  प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस यशराज पारखी यांच्यासह राज्यभरातील शिक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here