Bhandup Hospital Fire | मुंबई – भांडूपच्या मॉलमधील रुग्णालयाला भीषण आग, दहा जणांचा होरपळून मृत्यू

2-killed-over-76-covid-patients-evacuated-as-fire-breaks-out-at-mumbai-hospital-Bhandup-Dream-mall-Sunrise-covid-Hospital-Fire
2-killed-over-76-covid-patients-evacuated-as-fire-breaks-out-at-mumbai-hospital-Bhandup-Dream-mall-Sunrise-covid-Hospital-Fire

मुंबई: भांडूपच्या ड्रीम मॉलमधील Bhandup Dream mall सनराईस रुग्णालयाला रात्रीच्या सुमारास भीषण आग Sunrise covid Hospital Fire लागली आहे. या आगीत दहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे.

आग लागल्यानंतर जवळपास ७० कोरोना रुग्णांची सुटका करण्यात आली. रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास ड्रीम्स मॉल सनराइज हॉस्पिटलमध्ये ही आग लागली. मुंबईत एकीकडे कोरोना रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत असतानाच आग लागल्याची ही घटना घडली. गुरुवारी मुंबईत तब्बल ५५०४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या २२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे.

“आगीमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. रात्री १२.३० वाजता रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर आग लागली होती. अग्निशमन दलाच्या २२ ते २३ गाड्या घटनास्थळी उपस्थित आहेत,” अशी माहिती पोलीस अधिकारी प्रशांत कदम यांनी एएनआयला दिली.

“७३ पैकी ३० रुग्णांना मुलुंडच्या जम्बो सेंटरमध्ये हलवण्यात आलं असून तिघांना फोर्टीस रुग्णालयात शिफ्ट करण्यात आलं आहे. याशिवाय इतर रुग्ण हॉस्पिटलच्या इतर वॉर्डमध्ये दाखल आहेत,” अशी माहिती एका वरिष्ठ डॉक्टरांनी दिली आह

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरदेखील घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. “पहिल्यांदाच मी मॉलमध्ये हॉस्पिटल पाहत आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. सात रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. ७० रुग्णांना इतर रुग्णालयात नेण्यात आलं आहे. आगीचं कारण जाणून घेण्यासाठी तपास केला जाईल,” असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here