मुंबई l कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद आहेत. २३ नोव्हेंबरपासून राज्यातील ९ ते १२ वी इयत्तेचे प्रत्यक्ष वर्ग सुरू होत आहेत. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी teachers-corona-test सक्तीची करण्यात आली आहे. सुमारे १० लाख शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आता आठवडाभरात स्वखर्चाने आरटीपीसीआर चाचणी करावी लागणार आहे.government-order-to-more-than-10-lakh-teachers-to-do-corona-test
शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी शाळा सुरू करण्याची एसओपी जारी केली. त्यात १ ते १२ वीपर्यंतच्या राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना teachers-corona-test चाचणीचे बंधन आहे. तसेच ही चाचणी १७ ते २२ नोव्हेंबर या कालावधीची असावी आणि नकारात्मक चाचणीचे प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापन समितीस सादर करण्यास बजावण्यात आले आहे.
हेही वाचा l Mumbai Indians l मुंबई इंडियन्स पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन
अशी आहे एसओपी
प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकांची लेखी संमती हवी. एका बाकावर एक विद्यार्थी बसवावा. क्रीडा, स्नेहसंमेलन रद्दच असावे. स्कूल बस, शाळा दररोज निर्जंतुक कराव्यात. हात धुण्याची व्यवस्था हवी. विद्यार्थ्यांना हजेरीचे बंधन नसावे. ऑनलाइन व ऑफलाइन वर्गाचे वेळापत्रक स्वतंत्र असावे.
हेही वाचा l Bihar Result l ”जुगाड करून आकडा वाढवणे हा विजय नसतो”; शिवसेनेचा भाजपावर हल्लाबोल













































































































































