‘’उत्तरप्रदेश सरकार काय लपवायचा प्रयत्न करत आहे’’?; राज ठाकरे संतप्त

international-womens-day-raj-thackeray-greetings-on-occasion-womens-day-raj-thackeray-tweet-on-womens-day-news-updates
international-womens-day-raj-thackeray-greetings-on-occasion-womens-day-raj-thackeray-tweet-on-womens-day-news-updates

मुंबई : उत्तरप्रदेशातील हाथरस येथे घडलेली बलात्काराची घटना घडली. (Hathras Gangrape Case).  उपचारा दरम्यान पीडित मुलीचा झालेला मृत्यू हे मन विषण्ण करणारं आहे. भीषण प्रकार म्हणजे त्या मुलीचा मृतदेह तिच्या घरच्यांच्या ताब्यात न देता तिच्यावर परप्सर अंत्यसंस्कार केला. उत्तरप्रदेश सरकार नक्की काय लपवायचा प्रयत्न करत आहे? असा संतप्त सवाल  मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी उपस्थित केला आहे.

कुटुंबियांना भेटण्यापासून का अडवलं जात आहे, नक्की कशाची भीती सरकारला वाटत आहे असाही प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला आहे.  महाराष्ट्रात काही झालं की स्वतःला देशाचा आवाज घोषित करुन अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का आहेत?? असा प्रश्न विचारत राज ठाकरेंनी प्रसारमाध्यमांनाही जाब विचारला आहे.

प्रमुख विरोधीपक्ष असलेला काँग्रेससह सर्व राजकीय पक्ष योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला धारेवर धरत आहेत. पीडित मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिचा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

राज ठाकरेंनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपली प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. यावेळी राज ठाकरेंनी पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यापासून का अडवलं जात आहे, नक्की कशाची भीती सरकारला वाटत आहे असा प्रश्न विचारला आहे.

वाचा : राहुल गांधीना पोलिसांनी  का केली धक्काबुक्की click करा

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरसला पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात होते. यावेळी पोलिसांनी राहुल गांधींना धक्काबुक्की केली. कॉलर पकडून जमिनीवर पाडलं. त्यांना ताब्यात घेतलं होतं.

यासोबत पीडितेच्या गळ्यावर आढलेल्या खुणा तिचा गळा दाबल्याचं स्पष्ट करत असल्याचंही अहवालात नमूद आहे. पीडितेचा गळा दाबवण्यात आला असला तरी त्यामुळे मृत्यू झाला नसल्याचाही अहवालात उल्लेख आहे. व्हिसेराच्या आधारे मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल असं अहवालात सांगण्यात आलं आहे. पीडितेच्या अहवालावरून विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरसमधील बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी जात असताना पोलिसांनी रोखल्यानंतर राहुल गांधी चालत निघाले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवलं. पोलिसांनी लाठीचार्ज करुन आपल्याला खाली पाडलं असं राहुल गांधींनी सांगितलं.

राहुल गांधी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पोलिसांकडून मला धक्काबुक्की करण्यात आली. लाठीचार्ज करुन मला खाली पाडलं. फक्त मोदीच या देशात चालू शकतात का ? सर्वसामान्य व्यक्तीला ही परवानगी नाही का ? आमचं वाहन थांबवण्यात आलं म्हणूनच चालत निघालो होतो” असंही राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या स्वागतासाठी दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. पोलिसांनी रोखल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कार्यकर्त्यांसोबत पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान हाथरस जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत हे आदेश लागू आहेत. तर सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here