Mumbai Indians l मुंबई इंडियन्स पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन

ipl-2020-mi-vs-dc-mumbai-indians-won-by-5-wickets
ipl-2020-mi-vs-dc-mumbai-indians-won-by-5-wickets

दुबई Dubai l आयपीएलची फायनल मॅच मुंबई इंडियन्सने Mumbai Indians पाच विकेट राखून जिंकली. या विजयामुळे मुंबई इंडियन्सची टीम पाचव्यांदाच आयपीएल चॅम्पियन झाली. 

आयपीएलच्या फायनल मॅचमध्ये टॉस जिंकून दिल्ली कॅपिटल्सने Delhi Capitals फलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्लीने २० ओव्हरमध्ये ७ बाद १५६ धावा केल्या आणि मुंबई इंडियन्सला Mumbai Indians १५७ धावांचे आव्हान दिले.

मुंबई इंडियन्सने १८.४ ओव्हरमध्ये पाच बाद १५७ धावा करुन मॅच पाच विकेट राखून जिंकली. कॅप्टन रोहित शर्माने ६८ धावा, इशान किशनने नाबाद ३३ धावा, क्विंटन डी कॉकने २० धावा, सूर्यकुमार यादवने १९ धावा, कायरन पोलार्डने ९ धावा, हार्दिक पांड्याने ३ धावा आणि कृणाल पांड्याने नाबाद १ धाव अशी कामगिरी केली.

दिल्ली कॅपिटल्सच्या एनरिच नोर्टजेने रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याला बाद केले. मार्कस स्टोइनिसने क्विंटन डी कॉकला आणि कगिसो रबाडाने कायरन पोलार्डला बाद केले. सूर्यकुमार यादव धावचीत झाला.

याआधी प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सच्या श्रेयस अय्यरने नाबाद ६५ धावा, रिषभ पंतने ५६ धावा, शिखर धवनने १५ धावा, अक्षर पटेलने ९ धावा, शिमरॉन हेटमायरने ५ धावा, अजिंक्य रहाणेने २ धावा अशी कामगिरी केली. 

कगिसो रबाडा एकही चेंडू न खेळता शून्य धावांवर धावचीत झाला. मार्कस स्टोइनिस शून्य धावा करुन बाद झाला. दिल्लीने २० ओव्हरमध्ये ७ बाद १५६ धावा केल्या. मुंबई इंडियन्सच्या ट्रेंट बोल्टने मार्कस स्टोइनिस, अजिंक्य रहाणे आणि शिमरॉन हेटमायर या तीन फलंदाजांना बाद केले. नॅथन कूल्टर नाइलने रिषभ पंत आणि अक्षर पटेलला बाद केले. जयंत यादवने शिखर धवनला बाद केले.

रोहित शर्माची कमाल, २००व्या आयपीेलमध्ये शानदार कामगिरी

मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा कारकिर्दीतील २००वी आयपीएल मॅच खेळत होता. या मॅचमध्ये विजय मिळवून देत पाचव्यांचा स्वतःच्या नेतृत्वात मु्ंबई इंडियन्सला आयपीएल चॅम्पियन करणारा रोहित शर्मा हा आयपीएलच्या तेरा सीझनमधील सर्वाधिक यशस्वी कॅप्टन झाला. 

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० या पाच आयपीएल स्पर्धा जिंकल्या. रोहित शर्माने मुंबई इंडियन्स या एकाच टीमकडून १५० पेक्षा जास्त मॅच खेळल्या आहेत. सातत्याने एकाच टीमकडून सर्वोत्तम खेळी करणारा रोहित शर्मा हा खऱ्या अर्थाने आयपीएल स्टार प्लेअर झाला. फायनलमध्ये कॅप्टनला साजेशी खेळी करणाऱ्या रोहितने अर्धशतक झळकावले. त्याने ६८ धावा केल्या. 

रोहितच्या १२ मॅचमध्ये ३३२ धावा

रोहित शर्माने यंदाच्या आयपीएलमध्ये दुखापतीमुळे काही मॅचमध्ये विश्रांती घेतली. त्याने स्पर्धेतील १२ मॅच खेळून एकदा नाबाद राहण्याची कामगिरी केली. त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये ३३२ धावा केल्या. यात ८० धावा ही सर्वोत्तम खेळी होती.

हेही वाचा l Bihar Election Results 2020 l शरद पवार तेजस्वी यादव बद्दल म्हणालेत…

रोहितने यंदाच्या आयपीएलमध्ये तीन अर्धशतके झळकावली. यातले तिसरे अर्धशतक फायनल मॅचमधले होते. आयपीएलच्या १३ सीझनमध्ये मिळून २०० मॅच खेळणाऱ्या रोहित शर्माने २८ वेळा नाबाद राहण्याची किमया साधत ५,२३० धावा केल्या. यात नाबाद १०९ धावांची सर्वोत्तम खेळी आहे. रोहित शर्माने आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत एक शतक आणि ३९ अर्धशतके झळकावली आहेत. 

  • मॅन ऑफ द मॅच – ट्रेट बोल्ट
  • इमर्जिंग प्लेअर – देवदत्त पडिक्कल
  • व्हॅल्युएबल प्लेअर – जोफ्रा आर्चर
  • पेटीएम फेअरप्ले अॅवॉर्ड – मुंबई इंडियन्स
  • सुपर स्ट्रायकर – कायरन पोलार्ड
  • मोस्ट सिक्सेस – इशान किशन
  • गेम चेंजर – केएल राहुल
  • ऑरेंज कॅप – केएल राहुल
  • पर्पल कॅप – कगिसो रबाडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here