“लॉकडाउन उठवण्यास उद्धव ठाकरेंचा विरोध होता, ‘’संजय राऊतांचा मोठा खुलासा

cm-uddhav-thackeray-mumbai-police-and-slams-opposition-saying-now-defamers-shut-their-mouths
cm-uddhav-thackeray-mumbai-police-and-slams-opposition-saying-now-defamers-shut-their-mouths

मुंबई : पुण्यातील लॉकडाउन उठवण्यास उद्धव ठाकरेंचा विरोध होता. पुण्यात घाईघाईने लॉकडाऊन उठवला. पुण्यात अधिक लक्ष देणं गरजेचं आहे हे उद्धव ठाकरेंचं पहिल्या दिवसापासून म्हणणं होतं. आता ते मुंबई पॅटर्न राबवत आहे. असा मोठा खुलासा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी पुण्यातील लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका स्पष्ट केली. पुण्यात अधिक लक्ष देणं गरजेचं आहे हे उद्धव ठाकरेंचं पहिल्या दिवसापासून म्हणणं होतं. पुण्यात घाईघाईने लॉकडाउन उठवला त्यालाही मुख्यमंत्र्यांचा विरोध होता. पण आता ते मुंबई पॅटर्न राबवत आहे. त्यात काही अडचणी असतील त्या दुरुस्त करुन जनतेला उत्तम सुविधा मिळतील याची जबाबदारी फक्त सरकार किंवा जनतेची नाही तर विरोधी पक्ष म्हणून सगळ्यांची आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

पत्रकार पांडुरंग रायकर यांना उपचार मिळावेत यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आले. पण दुर्दैवाने त्यांना जी हवी होती ती रुग्णवाहिका मिळाली नाही. यासंदर्भात सुद्धा सरकारनं यापुढे काळजी घेणं गरजेचं आहे,” असंही यावेळी संजय राऊत म्हणाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here