अभिनेते महेश मांजरेकरांना 35 कोटींच्या खंडणीसाठी धमकी!

खंडणीसाठी मोबाइलवर पाठवला मेसेज,दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Actor Mahesh Manjrekar threatened for Rs 35 crore ransom!

मुंबई : अभिनेते, निर्माते महेश मांजरेकर यांना खंडणीसाठी अंडरवर्ल्डकडून धमकी देण्यात आली आहे. अंडरवर्ल्डच्या नावे महेश मांजरेकर यांना 35 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. (Actor Producer Mahesh Manjarekar gets threat call by name of underworld of 35 crore ransom) दरम्यान, खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

महेश मांजरेकरांना अबू सालेम टोळीकडून धमकी दिली अशी माहिती समोर आली आहे. मांजरेकर यांना रविवारी धमकी देण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी रत्नागिरीतील खेड येथून 32 वर्षाच्या युवकाला ताब्यात घेतले. दादार पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश मांजरेकर यांनी हिंदी-मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तसेच बॉडीगार्ड, रेगे, बाजीराव मस्तानी, जय हो, साहो, मुळशी पॅटर्न अशा अनेक सिनेमात ते झळकले आहेत. ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमाच्या दोन्ही पर्वाचे सूत्रसंचालन त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here