बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘एनआयए’ची पश्चिम बंगाल, केरळमध्ये छापेमारी

मुर्शिदाबाद, एर्नाकुलम येथील छापेमारीत ९ जणांना अटक

NIA-arrested-by-9 person-in-raids-conducted-west-bengal-kerala
एनआयएच्या छापेमारी 9 जण अटकेत NIA-arrested-by-9 person-in-raids-conducted-west-bengal-kerala

नवी दिल्ली : बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (एनआयए) शनिवारी सकाळी पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये छापेमारी केली. एनआयएनं पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद आणि केरळमधील एर्नाकुलम येथील छापेमारीत ९ जणांना अटक केली.

एनआयएनं पश्चिम बंगालमधून सहा तर केरळमधून तीन जणांना अटक केली. या ९ जणांकडून डिजिटल उपकरणं, काही कागदपत्रं, हत्यारं, देशी हत्यारं आणि स्फोटकं तयार करण्याची कागदपत्र सामग्री जप्त करण्यात आली. एनआयएला पश्चिम बंगाल आणि केरळसहित देशातील काही ठिकाणी आंतरराज्यीय मॉड्यूल बाबत माहिती मिळाली होती.

दिल्लीला शस्त्र खरेदीसाठी जाण्याचीही योजना 9 जणआखत होते,” असं एनआयएकडून सांगण्यात आलं. मुर्शीद हसन, याकूल बिस्वास, मोर्शफ हुसैन, नजुस साकिब, अबू सूफियान, मैनुल मंडल, लियू यीन अहमद, अल मामून कमाल आणि अतितुर रहमान अशी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं अटक केलेल्यांची नावं आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here